सलग चौथ्या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट उतरता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:27 AM2020-12-14T04:27:28+5:302020-12-14T04:27:28+5:30
दिवाळीनंतर काही दिवसांत वाढलेली रुग्णसंख्या आता दररोज कमी होताना दिसत आहे. दि. १५ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत एकुण ...
दिवाळीनंतर काही दिवसांत वाढलेली रुग्णसंख्या आता दररोज कमी होताना दिसत आहे. दि. १५ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत एकुण १६ हजार ८२६ चाचण्या झाल्या होत्या. त्यामध्ये सुमारे १९०० रुग्ण आढळल्याने पॉझटिव्हिटी रेट ११.३४ टक्के होता. त्यानंतर मात्र रुग्णसंख्येत सातत्याने घट होत गेल्याचे दिसून येते. प्रत्येक आठवड्यात हे प्रमाण जवळपास एक टक्क्यांनी कमी होत चालल्याने दिलासा मिळू लागला आहे. मागील आठवड्यात दररोज २ हजार ७७२ चाचण्या झाल्या असून त्यामध्ये २३४ रुग्ण आढळून आले. तर दररोज सहा जणांचा मृत्यू झाला. मागील चार आठवड्यांतील मृत्युचे हे सर्वाधिक प्रमाण आहे.
दरम्यान, मागील आठवडाभरात बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या १६१० एवढी आहे. कोरोनामुक्त रुग्णांचे एकुण प्रमाण ९४.४२ टक्के एवढे झाले आहे. मागील चार आठवड्यांतील पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असला तरी एकुण पॉझिटिव्हिटी रेट अद्यापही २० टक्क्यांच्या पुढे आहे. तसेच मृत्युदरही अडीच टक्क्यांच्या पुढेच असल्याने आकडेवारीवरून दिसते.
नागरिकही झालेत बिनधास्त
कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने नागरिक देखील बिनधास्त झाल्याचे दिसून येत आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असली, तरी कोणालाही भीती वाटत नाही. तसेच अनेक ठिकाणी सॅनिटायझरचा वापरही कमी झाल्याचे दिसते.
--------------------------------
मागील काही आठवड्यांतील स्थिती
कालावधी चाचण्या रुग्ण पॉझिटिव्हिटी रेट मृत्यू दर
६ ते १२ डिसें. १९,४०४ १६४१ ८.४५ २.६२
२९ नोव्हें. ते ५ डिसें. २०,३१४ १९७५ ९.७१ १.२६
२२ ते २८ नोव्हें. २२,८६१ २४१२ १०.५५ १.३२
१५ ते २१ नोव्हें. १६,८२६ १९१० ११.३४ १.८८
८ ते १४ नोव्हें. १२,५३४ १३१५ १०.४९ ३.२६
-----------------------------------------------------------------