जनावरांच्या कत्तलीसाठी जाणारा टेम्पो पोलीसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 11:41 PM2018-12-16T23:41:18+5:302018-12-16T23:41:35+5:30

दोघे ताब्यात : ग्रामस्थांच्या दक्षतेमुळे गुन्हा उघडकीस

In the possession of tempo police going to kill animals | जनावरांच्या कत्तलीसाठी जाणारा टेम्पो पोलीसांच्या ताब्यात

जनावरांच्या कत्तलीसाठी जाणारा टेम्पो पोलीसांच्या ताब्यात

Next

सांगवी : सावळ (ता. बारामती) येथे कत्तलीसाठी चाललेल्या जनावरांचा टेम्पो ग्रामस्थांच्या प्रसंगावधानतेमुळे आरोपीसह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. फिर्यादी सोमनाथ खोमणे (रा. सावळ, ता. बारामती) यांनी आरोपी तोफिक इम्तियाज कुरेशी (रा. मंगळवार पेठ, फलटण, ता. फलटण, जि. सातारा) याच्या विरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

शनिवारी (दि. १५) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सावळ (ता. बारामती) येथील भगत पेट्रोल पंपासमोरील रोडच्या कडेला आरोपी चालक अब्दुल इनामदार (रा. सासवड, ता. फलटण, जि. सातारा ) व्यापारी तोफिक इम्तियाज कुरेशी हे टेम्पो (क्रमांक एमएच ११/ एजी ६८७९) मधून पांढऱ्या रंगाचे बैल व किंकाळ्या, पांढºया रंगाची जर्सी गाय, २५ काळे पांढरे रंगाची वासरे ही दाटीवाटीने भरून नेत होते. फिर्यादी व त्यांचे काही साथीदार त्याठिकाणी थांबले असता, टेम्पोतील जनावरांची पाहणी केली. संशय आल्याने तातडीने बारामती पोलिसांना खबर दिली. आरोपी कुरेशी याच्यासह टेम्पो पोलीस ठाण्यात नेण्यात आला. वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना अवैधरित्या जनावरांची वाहतूक, जनावरांना चारा-पाण्याची व्यवस्था न करता बेकायदेशीररीत्या कत्तलीसाठी वाहतूक करीत करत असल्या प्रकरणी टेम्पो ताब्यात घेण्यात आला.
 

Web Title: In the possession of tempo police going to kill animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे