...त्या पोलिसांची ओली पार्टी व्हायरल, संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 02:52 AM2018-04-04T02:52:37+5:302018-04-04T02:52:37+5:30

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर किवळे येथे शुक्रवारी सायंकाळी चाकण पोलिसांची जीप दाखल झाली. तेथून मोटारीतून जात असलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याला जीपमधील पोलीस मद्य प्राशन करीत असल्याचे दिसून आले. आॅन ड्युटी असलेले पोलीस कर्मचारी मद्याच्या नशेत असल्याचे निदर्शनास आल्याने कार्यकर्त्याने त्यांना थांबविले.

 ... the possibility of action against the Oli Party Viral, those related to the police | ...त्या पोलिसांची ओली पार्टी व्हायरल, संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता

...त्या पोलिसांची ओली पार्टी व्हायरल, संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता

Next

पिंपरी  - पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर किवळे येथे शुक्रवारी सायंकाळी चाकण पोलिसांची जीप दाखल झाली. तेथून मोटारीतून जात असलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याला जीपमधील पोलीस मद्य प्राशन करीत असल्याचे दिसून आले. आॅन ड्युटी असलेले पोलीस कर्मचारी मद्याच्या नशेत असल्याचे निदर्शनास आल्याने कार्यकर्त्याने त्यांना थांबविले. आॅन ड्युटी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवू नका, असे पोलिसांना सांगत असल्याचे मोबाइलवरील चित्रीकरण फेसबुकवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. क्षणांत पोलिसांच्या ओल्या पार्टीची चित्रफित सर्वदूर पसरल्याने या प्रकरणाची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
पिंपरीतील काळेवाडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते योगेश मालखरे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह देहूरोड येथून जात होते. त्या वेळी आॅन ड्युटी असलेले पोलीस कर्मचारी मोटारीत बसूनच मद्य प्राशन करीत असल्याचे त्यांना दिसले. पोलिसांची जीप थांबवून पोलिसांनी आॅन ड्युटी असे काम करणे चुकीचे आहे. मोटारीत मद्याच्या बाटल्या, फरसाण, शेंगदाणे असल्याचे निदर्शनास आल्याने सहकाºयाला मोबाइलवर चित्रीकरण करण्यास सांगून मालखरे पोलिसांशी संवाद साधत होते.
मालखरे यांनी थांबवून ठेवलेल्या मोटारीत पोलीस कर्मचारी वाहनचालक बी. के. साबळे (चाकण पोलीस ठाणे), तसेच हवालदार सोनवणे होते. मालखरे त्यांच्याजवळ येऊन तुम्ही आॅन ड्युटी पोलीस कर्मचारी आहात, तरीही मद्यपान करून वाहन चालवीत आहात. अशा अवस्थेत तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही, असे म्हणू लागला. त्या वेळी भांबावलेले पोलीस कर्मचारी अक्षरश: हात जोडून त्यास विनवणी करीत होते.

कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार दाखल
‘‘उद्या आम्हाला फाशी घ्यायला लागेल, जाऊ दे आता ’’ असे म्हणत ते मालखरे या कार्यकर्त्याला हात जोडत होते. मात्र, दुस-या दिवशी सरकारी कामात अडथळा आणल्याचे कारण देत साबळे यांनी मालखरेसह अन्य दोघांविरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार दाखल केली. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोलिसांवरही कारवाई होणार आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाºयांकडून या प्रकरणी गंभीर दखल घेतली गेली आहे. पोलीस खात्याची बदनामी होईल, असे कृत्य करणाºया पोलीस कर्मचाºयांवरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title:  ... the possibility of action against the Oli Party Viral, those related to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.