पालखी सोहळ्यानंतर पुण्यात पाणी कपातीची शक्यता, धरणांतील पाणीसाठी तळाकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 09:37 AM2024-06-25T09:37:06+5:302024-06-25T09:40:05+5:30

खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने महापालिकेने पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे पत्र जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठविले होते...

Possibility of water cut in Pune after Palkhi ceremony, water from dams to bottom | पालखी सोहळ्यानंतर पुण्यात पाणी कपातीची शक्यता, धरणांतील पाणीसाठी तळाकडे

पालखी सोहळ्यानंतर पुण्यात पाणी कपातीची शक्यता, धरणांतील पाणीसाठी तळाकडे

पुणे : जून महिना संपण्यास काही दिवस बाकी राहिले असतानाही पाऊस झालेला नाही. त्यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पामध्ये म्हणजे चारही धरणामध्ये केवळ ३.५८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. शहराला दररोज ०.०५ टीएमसी म्हणजे १४७० एमएलडी पाणी लागले. याप्रमाणे दर महिन्याला १.५० टीएमसी पाण्याचा वापर शहरासाठी होतो. महिना अखेरीस संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांची पालखी पुणे जिल्ह्यातून जाणार असल्याचे त्यासाठी अर्धा टीएमसी पाणी कॅनॉलमधून सोडावे लागते. त्यामुळे पालखी सोहळा पुण्यातून मार्गस्थ झाल्यानंतर पाणी कपातीबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने महापालिकेने पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे पत्र जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठविले होते. पुण्याकडे व धरण क्षेत्रात अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही, चारीही धरणात मिळून केवळ ३.५८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. जून महिना संपत आला तरीही पुणे शहरासह खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाला सुरुवात झालेली नाही. दैनंदिन पाणी पुरवठ्यात महापालिका कपात न करता गळतीचे प्रमाण कमी करून पाणी बचत करण्यावर प्रशासनाने भर दिला. यासाठी पर्वती जलकेंद्र, वारजे जलकेंद्र, लष्कर जलकेंद्रात गळती थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, शहरात होणाऱ्या असमान पाणी पुरवठ्यामुळे अनेक भागात कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत आहे.

तसेच महिना अखेरीस संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांची पालखी पुणे जिल्ह्यातून जाणार असल्याचे त्यासाठी अर्धा टीएमसी पाणी कॅनॉलमधून सोडावे लागते. धरणातील पाणी कमी झाल्याने पाणी पुरवठ्याच्या नियोजनासंदर्भात महापालिका आयुक्तांसोबत पालखी सोहळा पुण्यात येण्यापूर्वी चर्चा केली जाईल. पालखी पुण्यातून बाहेर गेल्यानंतर पाणी कपातीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.

पाऊस पडला नाही तर पाणी कपात टळणार

जून महिना संपत आला तरीही पुणे शहरासह खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे धरणात पाणीसाठा जमा झालेला नाही. धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस पडल्यानंतर पालिकेला पाणी कपात करावी लागणार नाही.

Web Title: Possibility of water cut in Pune after Palkhi ceremony, water from dams to bottom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.