उजनीचे पाण्याचे नियोजन कोलमडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 02:14 AM2018-11-01T02:14:28+5:302018-11-01T02:16:28+5:30

मराठवाडा बोगदा प्रकल्पाचे काम थांबवा; धरणग्रस्त कृती समितीचा आंदोलनाचा इशारा

The possibility of thunderstorming of Uighi water planning | उजनीचे पाण्याचे नियोजन कोलमडण्याची शक्यता

उजनीचे पाण्याचे नियोजन कोलमडण्याची शक्यता

Next

इंदापूर : निरा भिमा स्थिरीकरण अंतर्गत निरा खोऱ्यातून उजनी जलाशयाचे पाणी मराठवाड्यास देण्याचे नियोजन सुरु आहे. यासाठी निरा ते उजनी जलाशय व उजनी जलाशय ते सिना कोळगाव धरणापर्यंत (ता. परांडा) कालव्याचे काम सुरु झाले आहे. या कालव्यातून मराठवाडा भागासाठी देण्यात येणारे पाणी पावसाळ्यातच उजनी जलाशयातून लगेच पुढे मराठवाड्याकडे नेले जाणार आहे. उजनी धरणातील मृतसाठ्यातील पाणी देखील जाणार असल्याने पाण्याचे नियोजन कोलमडून पडणार आहे. त्यामुळे ज्या शेतकºयांच्या जमिनी, शेती गेली त्यांच्यावर अन्याय होणार आहे.

हे पाणी उजनी धरण ३० टक्के भरल्यानंतर म्हणजेच जलाशयाची पातळी ४९३ मीटर झाल्यानंतरच प्रवाही होणार आहे. त्यासाठी या कालव्याची पातळी ४८७ मीटर इतकी घेतली आहे. म्हणजेच धरणातील मुख्यकालव्याच्या तळपातळीपेक्षा ही खाली ठेवली गेली आहे. वास्तविक पहाता जलशास्त्राचा अभ्यास केल्यास ४९३ मीटरच्या वरील पाणी पुढे जाण्यासाठी ४९२ सुरवातीची तळपातळी पुरेशी आहे. मात्र ही पातळी ४८७ घेतल्यामुळे उजनी धरणातील जिवंत व मृतसाठ्यातील पाणी मराठवाड्याकडे नेहण्याचा उद्देश सरळ दिसून येत आहे. त्यामुळे पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यास पाणी कमी पडणार असून त्यांचे पाणी नियोजन कोलमडून, कोट्यावधी रूपयांचे नुकसान होणार आहे. तसेच ज्यादा खोलीवरून कालवा खोदल्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये वाया जाणार आहेत.

उजनी धरणाची पुर्ण संचय पातळी ४९६. ८२ असून धरणाची पाणी साठवण क्षमता ११६.२३ टीएमसी इतकी आहे. धरणाच्या मुळ प्रकल्प अहवालात नियोजित असलेल्या सिंचन क्षेत्रासाठीच्या कालव्याची सुरवातीची पातळी
मुख्य कालवा - ४८७.२०
भिमा सिना जोड कालवा बोगदा सुरवातीची तळ पातळी - ४८८.२०,
सिना माढा उपसा सिंचन योजना पाणी उचलण्याची सर्वात खालची पातळी ४९१.०३ मीटर,
धरणाची पाणी वापराची कमीतकमी पातळी (एमडीडीएल) ४९१.०३ मीटर आहे.
यातील पाणी कमी झाल्यास उजनीच्या पाण्यावर अवलंबून असणाºया बºयाच शेतकºयांचे नुकसान होणार आहे.

उजनी धरणातील पाणी मूळ लाभधारक शेतकºयांना मिळत नाही. अक्कलकोट व मंगळवेढा या कालव्याच्या शेवटच्या भागात अद्यापही पाणी पोहोचलेले नाही. नियोजनात समाविष्ट केलेल्या नऊ उपसा सिंचन योजना अद्याप अपुर्णावस्थेतच आहेत.नवीन नियोजनात नसलेल्या बोगद्याची सुरवातीची तळपातळी ४८७ ऐवजी ४९२ रहाणे गरजेचे आहे. अन्यथा सिंचनास देखील पाणी मिळणार नाही व शेतकºयांचे नुकसान होईल. सध्या मराठवाडा बोगद्याचे २९ किलोमीटरचे काम होणार असून सदर काम ताबडतोब थांबविणे गरजेचे आहे. सहा तालुक्यातील उपसा सिंचन योजनेतील तसेच शेतकºयांनी वेळीच जागे न झाल्यास त्यांचे नुकसान होणार आहे.त्यामुळे या बोगद्याचे काम त्वरित न थांबविल्यास धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती उजनी धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष अरविंद जगताप यांनी दिली.

Web Title: The possibility of thunderstorming of Uighi water planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.