मुख्यमंत्र्यांकडून कठोर निर्णयाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:12 AM2021-03-23T04:12:05+5:302021-03-23T04:12:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “कोरोना रुग्ण जर वेगाने वाढत असतील तर काही शहरांबाबत लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय घ्यावा लागेल, ...

Possibility of tough decision from CM | मुख्यमंत्र्यांकडून कठोर निर्णयाची शक्यता

मुख्यमंत्र्यांकडून कठोर निर्णयाची शक्यता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “कोरोना रुग्ण जर वेगाने वाढत असतील तर काही शहरांबाबत लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय घ्यावा लागेल, असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. मंगळवारी (दि. २३) पुन्हा राज्यातील कोरोना परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा होणार आहे. यानंतर लॉकडाऊन की आणखी कठोर निर्बंध लागू करायचे याबाबत मुख्यमंत्री निर्णय जाहीर करतील,” अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

लॉकडाऊन टाळायचा असेल तर जनतेने नियम पाळायला हवेत, असेही टोपे म्हणाले. सोमवारी (दि. २२) ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

टोपे म्हणाले, “सध्या पुरेशा प्रमाणात खाटा उपलब्ध आहेत. मात्र वाढती संख्या लक्षात घेता आणखी तयारी करावी लागणार आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन, अंमलबजावणी राज्यात होत आहे. आजमितीला राज्यात २ लाख १० हजार सक्रिय रुग्ण असून, त्यापैकी ८५ टक्के लक्षणविरहित आहेत. मृत्यूदर ०.४ टक्के आहे. पण याच वेळी मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.”

सध्या लागू असलेल्या निर्बंधांचे सक्तीने अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. रोज सरासरी ३ लाख लसीकरण होत आहे. आतापर्यंत राज्यात ४५ लाख लसीकरण पूर्ण झाले आहे. कोविशिल्डच्या दोन डोसमध्ये ४५ ते ६० दिवसांचे अंतर ठेवण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची रुग्णवाढीची टक्केवारी कमी आहे, असे टोपे यांनी नमूद केले. ‘हाफकीन’मध्ये लसीच्या निर्मितीला परवानगी मिळावी. तिथे १७ लाख डोस तयार करू शकतो. याविषयी मुख्यमंत्र्यांसोबत बोलणे झाल्याचेही टोपे यांनी सांगितले.

चौकट

“खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांसाठी ८० टक्के खाटा ठेवण्यात येतील. तसेच हा डाटा नियमितपणे अपडेट केला जाईल. रुग्णांना वेळेत उपचार मिळतील याला प्राधान्य दिले जात आहे.”

- आरोग्यमंत्री राजेश टोपे.

Web Title: Possibility of tough decision from CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.