बनावट प्रमाणपत्राद्वारे खेळाडू कोट्यातून मिळविले पोलीस उपनिरीक्षक पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:11 AM2021-09-13T04:11:12+5:302021-09-13T04:11:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचे बनावट प्रमाणपत्र सादर करुन त्याद्वारे खेळाडू आरक्षणामधून पोलीस उपनिरीक्षक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचे बनावट प्रमाणपत्र सादर करुन त्याद्वारे खेळाडू आरक्षणामधून पोलीस उपनिरीक्षक पद मिळवून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी महादेव अशोक सकपाळ (रा. मधुराज गणेश सोसायटी, शिवाजीनगर, मूळ रा. धामणगाव, ता. आष्टी, जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी क्रीडा व युवक सेवा विभागाच्या उपसंचालिका प्रमोदिनी अमृतवाड यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने वरिष्ठ राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग चॅम्पियन २०१० मध्ये तमिळनाडूमधील कोईमतूर येथे ४ ते ९ ऑगस्ट २०१० दरम्यान झालेल्या स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत ७५ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक पटकावल्याचे खोटे व बनावट प्रमाणपत्र सादर करुन खेळाडू आरक्षणामधून पोलीस उपनिरीक्षक पद मिळवून शासनाची तसेच विभागीय क्रीडा संकुल या कार्यालयाची फसवणूक केली आहे.