टपाल विभागातही आता विमा एजंट नियुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:16 AM2021-08-25T04:16:24+5:302021-08-25T04:16:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना व लाॅकडाऊनमुळे नोकरी गमावलेल्या अनेकांना टपाल जीवन विमा, ग्रामीण टपाल जीवन विमा विभागात ...

The postal department will now also appoint an insurance agent | टपाल विभागातही आता विमा एजंट नियुक्त करणार

टपाल विभागातही आता विमा एजंट नियुक्त करणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना व लाॅकडाऊनमुळे नोकरी गमावलेल्या अनेकांना टपाल जीवन विमा, ग्रामीण टपाल जीवन विमा विभागात एजंट म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते. पुणे शहर आणि जिल्ह्यात अशा विमा एजंटांची नियुक्ती करण्यात येणार असून, यासाठी येत्या ७ सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते चार या वेळेत पुण्यात थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत.

गेल्या दीड दोन वर्षांत कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या अशा बेरोजगारीच्या परिस्थितीत टपाल विभागाकडून मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी टपाल जीवन विमा, ग्रामीण टपाल जीवन विमा थेट मुलाखतीसाठी जंगली महाराज रस्ता येथील अधीक्षक डाकघर, पुणे ग्रामीण विभाग या पत्त्यावर शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच पॅन कार्ड, आधार कार्ड व अन्य संबंधित दस्तावेजसह येत्या ७ सप्टेंबर रोजी उपस्थित राहावे, असे आवाहन पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक डाकघर यांनी केले आहे.

या टपाल विभागातील विमा एजंटसाठी १८ वर्षांपासून ५० वर्षांपर्यंत कोणीही मुलाखत देऊ शकतात. बेरोजगार , स्वयंरोजगार व्यक्ती, माजी जीवन विमा सल्लागार , कोणत्याही विमा कंपनीचे माजी अभिकर्ता, माजी सैनिक, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, निवृत्त शिक्षक, स्वयंसहायता समूह पदाधिकारी इत्यादी टपाल जीवन विमा अभिकर्ता यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. टपाल विमा एजंटांना नियुक्तीनंतर टपाल विभागाने निर्धारित केलेले कमिशन प्रोत्साहन भत्ता नियमितपणे देण्यात येणार आहे.

Web Title: The postal department will now also appoint an insurance agent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.