करावे तेवढे कौतुक कमीच! कोरोनाच्या संकटकाळात मृतदेहांसाठी २४ तास झटतेय ससूनचे 'शवागार'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 05:55 PM2020-07-21T17:55:51+5:302020-07-21T18:00:02+5:30

एप्रिल महिन्यात ससून रुग्णालयातील मृतांचा आकडा देशात सर्वाधिक वेगाने वाढणारा होता.

Postpartum room work 24 hours in the corona virus danger period | करावे तेवढे कौतुक कमीच! कोरोनाच्या संकटकाळात मृतदेहांसाठी २४ तास झटतेय ससूनचे 'शवागार'

करावे तेवढे कौतुक कमीच! कोरोनाच्या संकटकाळात मृतदेहांसाठी २४ तास झटतेय ससूनचे 'शवागार'

Next
ठळक मुद्देदररोज ४० मृतदेह, ताण वाढला

राजानंद मोरे -
पुणे : मी शवागार... ससून रुग्णालयात अनेक वर्षांपासून आहे. मृतदेहांची चिरफाड अन् नातेवाईकांची गर्दी, आक्रोश पाहत आलोय... पण मागील चार महिने नातेवाईकही दिसत नाहीत... दिसतात ते मृतदेह... कुणी कोरोना विषाणुचा संसर्ग झाल्याने तर कुणी इतर आजारांनी मृत्यूमुखी पडलेले... पूर्वीपेक्षा दुप्पट झालेत... येथील डॉक्टर व कर्मचारी मात्र थकत नाहीत... मृतदेहांसाठी अहोरात्र झटत आहेत... डॉक्टर्स, नातेवाईक, पालिका प्रशासन, पोलिसांशी संपर्क साधून मृतदेहांवर वेळेत अंत्यसंस्कार व्हावेत यासाठी...

शहरातील कोरोनाबाधित रुग्णाचा पहिला मृत्यू खासगी रुग्णालयात झाला असला तरी एप्रिल महिन्यात ससून रुग्णालयातील मृतांचा आकडा देशात सर्वाधिक वेगाने वाढणारा होता. त्यानंतर मागील चार महिने हे प्रमाण कमी-अधिक आहे. रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित रुग्ण, कोरोना संशयित रुग्ण, इतर आजार किंवा अपघातांमुळे झालेले मृत्यू, अन्य रुग्णालयांतून आणण्यात आलेले मृतदेह शवागारात ठेवले जातात. सध्या रोजच्या चोवीस तासात ४० ते ५० मृतदेह या शवागारात येतात. त्यामुळे जवळपास १० ते १५ मृतदेह कोरोनाबाधित रुग्णांचे असतात. शवागारामध्ये आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांचे जवळपास ४०० मृतदेह आले आहेत. या मृतदेहांचे पोस्टमार्टेम होत नाही. पण त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ते नातेवाईकांच्या ताब्यात दिले जात नाहीत.


शवागाराकडे मृतदेह आल्यानंतर आधी संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधून मृत्यूचे कारण नमुद केले जाते. रुग्ण कोरोनाबाधित नसल्यास किंवा संशयित असल्यास त्याचे पोस्टमॉर्टेम केले जाते. पण त्यानंतर नातेवाईकांच्या संमतीशिवाय महापालिकेच्या ताब्यात दिला जात नाही. मोजक्याच नातेवाईकांना आवश्यक कागदपत्रे घेऊन बोलाविले जाते. त्यांच्याकडून डेथ पाससाठीची प्रक्रिया पुर्ण केली जाते. त्यानंंतर कोरोनाबाधित नसलेले मृतदेह नातेवाईकांकडे तर कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह महापालिकेच्या ताब्यात दिले जातात. ही प्रक्रिया चोवीस तास सुरू असते. त्यासाठी शवागारातील डॉक्टर व कर्मचारी सतत काम करत असतात, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
--------------------
... तर नातेवाईक येत नाहीत
कुटुंबातील सदस्यही कोरोनाबाधित किंवा क्वारंटाईन असल्यास एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह नेण्यासाठी त्यांना येता येत नाही. अशावेळी शक्य असल्यास त्यांना किमान अर्ध्या तासासाठी सोडण्याची विनंती केली जाते. तरीही शक्य न झाल्यास पोलिसांना कळवून संमतीची प्रक्रिया पुर्ण केली जाते. जवळपास चार तासात ही प्रक्रिया पुर्ण होते. त्यानंतर मग महापालिकेच्या यंत्रणेमार्फत अंत्यसंस्कार केले जातात.
---------------
कोरोनाबाधित रुग्णांचे दररोजचे १० ते १५ मृतदेह तसेच इतर कारणांमुळे अन्य रुग्णालयांतून येणाºया मृतदेहांमुळे शवागारावरील ताण जवळपास दुपटीने वाढला आहे. दररोज ४० ते ५० मृतदेह येथील कर्मचाºयांना हाताळावे लागत आहेत. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिचारिकांच्या तुटवड्याप्रमाणेच इथेही कर्मचाºयांचाही तुटवडा आहे. पण मागील चार महिन्यांपासून हे कर्मचारी सातत्याने ही जबाबदारी पार पाडत आहेत.
 

Web Title: Postpartum room work 24 hours in the corona virus danger period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.