ऑफलाईन वर्गांना स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:16 AM2021-02-23T04:16:01+5:302021-02-23T04:16:01+5:30
राज्याच्या उच्च शिक्षण विभागातर्फे १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालयांमध्ये ऑफलाइन वर्ग घेण्यास परवानगी दिले होती. त्यानुसार शहरातील काही महाविद्यालयांनी ऑफलाइन वर्ग ...
राज्याच्या उच्च शिक्षण विभागातर्फे १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालयांमध्ये ऑफलाइन वर्ग घेण्यास परवानगी दिले होती. त्यानुसार शहरातील काही महाविद्यालयांनी ऑफलाइन वर्ग घेण्यास सुरुवात केली होती. तर काही महाविद्यालयांनी नियमितपणे ऑनलाइन वर्ग सुरू ठेवले होते. परंतु, फर्ग्युसनसह शहरातील काही नामांकित महाविद्यालयांनी आठवडाभरानंतर प्राप्त परिस्थितीचा आढावा घेऊन ऑफलाइन पद्धतीने वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अजित पवार यांनी महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ऑफलाइन वर्ग बंद करून अनेक महाविद्यालयांना पुन्हा ऑनलाईन वर्गांचे वेळापत्रक तयार करावे लागणार आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, प्रसारमाध्यमांमधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याची घोषणा केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आलेल्या ऑफलाईन वर्गांना स्थगिती दिली आहे. तसेच विद्यापीठातर्फे शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन केले जाणार आहे.