टाळे ठोकण्याचे आंदोलन स्थगित

By Admin | Published: April 25, 2017 03:52 AM2017-04-25T03:52:17+5:302017-04-25T03:52:17+5:30

जुन्नरच्या तहसीलदार आशा होळकर यांच्यावर कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालयाला टाळा ठोकणार असल्याचा इशारा आमदार

Postponement of blockage | टाळे ठोकण्याचे आंदोलन स्थगित

टाळे ठोकण्याचे आंदोलन स्थगित

googlenewsNext

जुन्नर : जुन्नरच्या तहसीलदार आशा होळकर यांच्यावर कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालयाला टाळा ठोकणार असल्याचा इशारा आमदार शरद सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिला होता. परंतु, कायदा सुव्यवस्थेबाबत कोणतीही बाधा येऊ नये, तसेच सामान्य जनतेची अडचण होऊ नये म्हणून टाळे ठोकण्याचे आंदोलन स्थगित करून प्रांताधिकारी कल्याण पांढरे यांना निवेदन दिल्याचे सोनवणे यांनी सांगितले.
आपटाळे येथील मंडल अधिकारी यांच्याशी संबंधित प्रकरणावरून वादग्रस्त टिप्पणी करणऱ्या तहसीलदार आशा होळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी जुन्नर तहसीलदार कार्यालयासमोर शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
तहसीलदार आशा होळकर यांची बदली करण्याची, तसेच निलंबन करण्याची मागणी केली. कार्यकर्त्यांनी तसेच तालुक्यातील विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी या वेळी महसूल विभागाच्या कार्यपद्धतीबाबत तसेच विविध प्रलंबित कामाबाबत तक्रारीचा पाढा प्रांताधिकारी कल्याण पांढरे यांच्यासमोर वाचला. या वेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, धनंजय डुंबरे, दत्ता शिंदे, जुन्नरचे नगरसेवक जमीर कागदी, जयसिंग पोटे, संदीप उतर्डे, रोहिदास कोल्हाळ, किरण कुटे, प्रकाश गाडेकर, संतोष घोटणे, महेश शेळके, शिवनेरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र ढोमसे, नीलेश चव्हाण, राजू कारभळ, विकास राऊत यांच्यासह नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी तहसीलदारांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत प्रांताधिकारी कल्याण पांढरे यांनी प्रशासकीय प्रमुख म्हणून दिलगिरी व्यक्त केली. तसेच शरद सोनवणे यांच्या मागणीसाठी तातडीने समाधानकारक तोडगा काढण्यात येईल. याबाबत सोनवणे व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करून जनतेला समाधानकारक असा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन प्रांताधिकारी कल्याण पांढरे यांनी आंदोलकांना दिले. (वार्ताहर)

Web Title: Postponement of blockage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.