संमेलनाला स्थगिती चांगला निर्णय (सिटीझन जर्नलिस्ट)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:13 AM2021-03-09T04:13:33+5:302021-03-09T04:13:33+5:30
संमेलनाला जर कंटोन्मेंट झोनमधील लोक आली तर काय करणार? विक्री झाली नाही तर आर्थिक तोटा देखील सहन करावा लागेल ...
संमेलनाला जर कंटोन्मेंट झोनमधील लोक आली तर काय करणार? विक्री झाली नाही तर आर्थिक तोटा देखील सहन करावा लागेल अशी भीती देखील काही प्रकाशकांमध्ये होती. प्रकाशक फारसे उत्सुक नव्हते. संमेलनाच्या सभामंडपात लोकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्यास सांगू शकतो पण स्टॉलवर गर्दी झाली तर काय करणारं? यातच संमेलनासाठी सभासदांची नोंदणी फारशी झालेली नव्हती. दरवर्षी 3 हजार रूपये भरून साहित्यिक, वाचनप्रेमी मंडळी नावनोंदणी करतात. पण केवळ 40 लोकांचीच नोंदणी झाली. याचा अर्थ लोकं कोरोनाला अजूनही घाबरत आहेत. संमेलनाच्या स्वागताध्यक्षांनाच कोरोना झाला होता. त्यांच्या संगतीत आलेल्या किती लोकांना कोरोना झाला असेल काय माहिती? उद्या कोरोना वाढत गेला असता तर त्याची जबाबदारी कोण घेणार?
साहित्य संमेलनात 14 हजार लोक बसतील एवढा मोठा मंडप केला होता. जिथे लग्नाला 50 ते 100 लोकांची परवानगी आहे पण संमेलनाला एवढी गर्दी पडवणारी असती का? त्यामुळे कोरोना काळात संमेलन न घेणे हा निर्णयच सुज्ञ आहे असे म्हणता येईल. सध्याच्या काळात लोकांचे आरोग्य हे महत्वाचे आहे. संमेलन होत राहातील पण गेलेला जीव परत येणार नाही. प्रकाशन व्यवसाय काहीसा अडचणीत असला तरी कोरोनाचे वातावरण निवळल्यानंतर पुन्हा व्यवसायाला उभारी मिळू शकेल. असा विश्वास आम्हाला आहे. सध्या तरी ‘ब्रेक’ घेणेचं हितावह आहे.
- अनिल कुलकर्णी, कार्याध्यक्ष मराठी प्रकाशक परिषद
---------------------------------------------------------------------------------