पुणे विद्यापीठाच्या ऑक्सीजन पार्क योजनेला स्थगिती;विद्यापीठात फिरण्यासाठी आकारले जाणार होते शुल्क
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 11:33 AM2021-06-12T11:33:10+5:302021-06-12T11:34:52+5:30
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आदेश
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठ आवारात ऑक्सीजन पार्क योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेअंतर्गत विद्यापीठात व्यायाम करण्यासाठी येणा-या नागरिकांकडून शुल्क आकारले जाणार होतो. परंतु, सर्वच क्षेत्रातून विरोध होत असल्यामुळे या योजनेस सध्या स्थगिती दिले जाणार आहे. लवकरच यासंदर्भातील परिपत्रक विद्यापीठाकडून प्रसिद्ध केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत थेट आदेश दिले आहेत.
विद्यापीठातर्फे ऑक्सीजन पार्क योजनेअंतर्गत विद्यापीठ आवारात फिरण्यास येणा-या नागरिकांना ६०० रुपये मासिक पास, सहामाही पाससाठी साडेपाच हजार रुपये आणि दहा हजार रुपयांचा वार्षिक पाससाठी आकारले जाणार होते. या शुल्कातून वैद्यकीय व रुग्णवाहिकेची सुविधा, ग्रंथालयाचे सदस्यत्व ,ओपन जिम, वार्षिक स्नेहसंमेलन , क्रीडा व व्यायाम सुविधेत सवलत आदी सुविधा दिल्या जाणार होत्या.
विद्यापीठात येणा-या कोणत्याही विद्यार्थी अथवा पालकांची अडवणूक केली जाणार नव्हती. तसेच विद्यापीठाकडे अर्ज केल्यास नागरिकांना शुल्कातून सूट दिली जाणार होती. परंत, सर्वच क्षेत्रातून याबाबत टीका होत असल्याने विद्यापीठाकडून या योजनेला स्थगिती दिली गेली आहे.
सामंत यांनी ट्विट करत," सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑक्सिजन पार्क योजनेअंतर्गत फिरायला येणाऱ्या नागरिकांना शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय स्थगित करून योजनेची पुनर्रचना करण्याचा सूचना प्रशासनास केल्या असून लवकरच स्थिगिती चे परिपत्रक निघेल "