महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरला; ठाकरवाडीला पिण्याचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:07 AM2021-07-24T04:07:50+5:302021-07-24T04:07:50+5:30
या पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच अक्षय पडवळ, ग्रा.पं.सदस्य ...
या पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच अक्षय पडवळ, ग्रा.पं.सदस्य अक्षय गाडे, संतोष पडवळ, माजी सरपंच दत्ता करंडे यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
भामा आसखेड धरण जवळ असूनही अनेक गावे अजूनही तहानलेली आहेत. त्यापैकी एक असलेल्या शेलू गावची पडवळ वस्ती आणि आदिवासी बांधवांची टाक्याची ठाकरवाडीला पिण्याचे पाणी नसल्याने येथील नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत होते. भामा आसखेड धरणावरील प्रादेशिक योजनेमध्ये शेलू गावचा समावेश नसल्याने पाणीपुरवठा देता येत नसल्याने जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून हे कनेक्शन मिळवून या पाणीपुरवठा योजनेसाठी २८ लाख रुपयांचा निधी खर्च करून दोन्ही वस्त्यांसाठी शुद्ध पाणीपुरवठा नळ योजना सुरू केली आहे. यामुळे गेली अनेक वर्षांपासून टाक्याची ठाकरवाडीची पाणी टंचाई दूर होऊन महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार आहे.
या योजनेसाठी सोमनाथ पडवळ, माजी ग्रा.पं. सदस्य संतोष पडवळ यांनी आपली लाखो रुपये किमतीची स्वतःची काही जागा साठवण टाकी साठी बक्षीस पत्र करून दिली.योजनेला विद्युत मोटारीची गरज लागत नसल्याने वीज बिलाच्या खर्चाची बचत होणार आहे.सर्व नागरिकांना घरोघरी नळाद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी पुरवले जात असून कनेक्शनसाठी पाणी मीटरचा अवलंब करण्यात आला आहे.पाणी नळाद्वारे दारात आल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले.
२३ आंबेठाण
230721\img-20210720-wa0042.jpg
???? ????? ??????? ???????? ???? ?????? ?????