बटाटाही महागला

By admin | Published: October 31, 2014 11:21 PM2014-10-31T23:21:28+5:302014-10-31T23:21:28+5:30

कांद्यानंतर आता बटाटाही ग्राहकांना रडवणार आहे. बटाटय़ाच्या किमतीही किलोमागे 1क् ते 15 रुपयांनी वाढल्या आहेत.

Potato expensive | बटाटाही महागला

बटाटाही महागला

Next
चाकण :  कांद्यानंतर आता बटाटाही ग्राहकांना रडवणार आहे. बटाटय़ाच्या किमतीही किलोमागे 1क् ते 15 रुपयांनी वाढल्या आहेत. खेड कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डात बटाटय़ाला प्रति क्विंटलला चक्क 3 हजार 2क्क् रुपयांचा भाव मिळाला ते किरकोळ बाजारातही चांगल्या प्रतीच्या बटाटय़ाला 32 रुपये किलो असा भाव मिळाला आहे. 
स्थानिक शेतक:यांच्या बटाटय़ाची आवक मंदावल्याने आणि प्रतिवर्षी आग्रा, गुजरात व उत्तर प्रदेश येथून येणा:या बटाटय़ाच्या आवकेत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे बटाटय़ाच्या भावाने उच्चांक गाठला आहे. मात्न, त्यामुळे सामान्यांच्या किचनचे बजेटच कोलमडून गेले आहे.
मागील आठवडय़ार्पयत बटाटय़ाचे भाव किलोमागे 2क् ते 24 रुपये होते. मात्न, ते आता 28 ते 32 रुपये किलोवर पोहोचले आहेत. यंदा अतिवृष्टीमुळे बटाटय़ाच्या पिकाचे नुकसान झाले असून, बाजारात कमी बटाटा आल्याने भाव वाढल्याची माहिती आडते असोशिएशनचे अध्यक्ष रामशेठ गोरे , जमीर काझी, राजू काझी, उस्मान काझी, दतात्नेय गोरे, आदी व्यापा:यांनी दिली.
चाकणमधील मार्केट यार्डात प्रतिवर्षी याच हंगामात आग्रा, गुजरात व उत्तर प्रदेश येथून मोठय़ा प्रमाणावर बटाटय़ाची आवक होत असते. मात्न, ती आवकही मोठय़ा प्रमाणात अद्यापही मंदावली असून, अत्यंत कमी आवकेचा परिणाम मोठय़ा भाववाढीत झाला आहे. 
चाकणमध्ये आज (दि. 29) आग्रा येथून तीन गाडय़ा ( 1 हजार पिशवी) बटाटय़ाची आवक झाली होती. चाकण मार्केट यार्डात आलेल्या कोरेगाव (ता. खेड, जि.पुणो) 
येथील साहेबराव मेंगळे व कोये (ता. खेड) येथील शिवराम गोगावले आदी शेतक:यांच्या बटाटय़ाला 32क्क् रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला आहे. दरम्यान, कांद्यापाठोपाठ  बटाटय़ाचे भाव कडाडल्याने ग्राहक मात्न रडकुंडीला आले आहेत. (वार्ताहर)
 
4काही व्यापा:यांच्या म्हणण्यानुसार परतीच्या पावसाचा फटका बसल्याने आवक कमी झाल्याने बटाटय़ाचे दर वधारले आहेत. दीड महिन्यापासून बटाटय़ाची आवक कमी राहून भाव अधिक राहिले आहे. 
4गेल्या आठवडय़ार्पयत बटाटय़ाचे दर मार्केटयार्डात 25क्क् रुपये प्रतिक्विंटल होते. मागील शनिवारी येथे बटाटय़ाची एकूण आवक 715  क्विंटल होऊन कामालभाव 25क्क् रुपयांर्पयत पोहोचले होते. 
4मात्न, त्यात आता कमालीची वाढ झाली आहे. 32क्क् रुपये क्विंटल हा या हंगामातील उच्चांकी भाव असल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले. 
 
नोव्हेंबर महिना हा टोमॅटोच्या मालाचा हंगाम असतो. या हंगामात दर वर्षी 8क् ते 9क् टक्के टोमॅटो माल विक्रीसाठी येत असतो. मात्न, पावसामुळे शेतातील उभे पीक नष्ट झाले होते. तसेच, रोपे पाण्यामुळे जळाल्याने सुरुवातीलाच टोमॅटो उत्पादकांना मोठा फटका सहन करावा लागल्याचे शेतक:यांनी सांगितले.  मागील पंधरवडय़ात कांदा बटाटय़ाबरोबर टोमॅटोही भाव खाऊ लागले होते, मात्न चांगला भाव मिळालेला टोमॅटो आता मात्न कवडीमोल भावाने विक्री करावा लागत आहे. उत्पादन खर्चही भरून येत नसल्याने बेभावाने टोमॅटो विक्री करण्याऐवजी अनेक शेतकरी बाजारात आणलेला टोमॅटो तसाच सोडून जात असल्याचे विपर्यस्त चित्न याभागात मागील आठवडय़ापासून पाहावयास मिळत आहे.

 

Web Title: Potato expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.