बटाटा काढणीस आला वेग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 02:07 AM2018-09-19T02:07:54+5:302018-09-19T02:08:11+5:30

या हंगामात उत्पादन चांगले होत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत; मात्र, बटाटा काढणीस मजुरांची टंचाई भासत आहे.

Potato extract | बटाटा काढणीस आला वेग...

बटाटा काढणीस आला वेग...

Next

दावडी : खेड तालुक्याच्या पूर्व भागात बटाटा काढणीची कामे प्रगतिपथावर आहेत. या हंगामात उत्पादन चांगले होत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत; मात्र, बटाटा काढणीस मजुरांची टंचाई भासत आहे.
खेड तालुक्याचा पूर्व भाग बटाटा पिकांचे आगार म्हणून ओळखला जातो. या परिसरातातील गुळाणी, वाफगाव, वरुडे, चिंचबाईवाडी, टाकळकरवाडी आदी गावांत शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात पाऊस पडल्यानंतर, अगाप बटाटा लागवड केल्या होत्या. सध्या हे पीक परिपक्व झाले असून शेतकºयांनी बटाटा काढणीस सुरुवात केली आहे. काढणीसाठी लाकडी नांगराचा वापर करून मजुरांकडून तो वेचून घेतला जात. वेचलेले बटाटे स्वच्छ करून बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येतात. बटाटे बाजारात पाठविणे शक्य नसल्यास काही शेतकरी शीतगृहात साठवून ठेवत असतात; तसेच काही शेतकरी, शीतगृहाची सोय नसल्यास शेतातच आरणीमध्ये साठवतात.
शेतकºयांनी पिकविलेला बटाटा विविध कंपन्या विकत घेत असते. बटाटा काढणीसाठी मजुरांची वाणवा जाणवत आहे. जादा पैसे देऊन मजूर परगाववरून आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था करावी लागत असल्याचे गुळाणी येथील बटाटा उत्पादक शेतकरी एकनाथ रोडे यांनी सांगितले. वाणाला गळीत चांगले निघत असल्याने शेतकºयांना थोड्याफार प्रमाणात नफा मिळणार आहे.

Web Title: Potato extract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.