कांद्यासह बटाटा, हिरव्या मिरचीचे भाव तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 02:39 AM2017-12-11T02:39:17+5:302017-12-11T02:39:29+5:30

चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांदा, बटाटा व हिरव्या मिरचीची किरकोळ आवक झाल्याने त्या सर्वांचे भाव तेजीत राहिले. जळगाव भुईमूग शेंगा व लसणाची उच्चांकी आवक झाल्याने त्यांचे भाव स्थिर राहिले.

 Potatoes, onions, green chilli and onion prices rose | कांद्यासह बटाटा, हिरव्या मिरचीचे भाव तेजीत

कांद्यासह बटाटा, हिरव्या मिरचीचे भाव तेजीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
आसखेड : चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांदा, बटाटा व हिरव्या मिरचीची किरकोळ आवक झाल्याने त्या सर्वांचे भाव तेजीत राहिले. जळगाव भुईमूग शेंगा व लसणाची उच्चांकी आवक झाल्याने त्यांचे भाव स्थिर राहिले. हिरव्या मिरचीची आवक घटल्याने भावात मोठी वाढ झाली. बटाट्याची आवक घटल्याने भावात थोडीशी वाढ झाली. टोमॅटोच्या आवकेत व भावातही घसरण झाली. बंदुक भुईमूग शेंगांची काहीही आवक झाली नाही. फळभाज्यांच्या बाजारात कोबी व भेंडीची किरकोळ आवक, तर फ्लॉवर आणि वांगी यांची उच्चांकी आवक झाली.
चाकणला गुरांच्या बाजारात या आठवड्यात जर्शी गाय व शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येत मोठी घट झाली. बैल व म्हशींच्या संख्येत थोडीशी वाढ झाली. शेळ्या-मेंढ्यांची संख्या घटूनही भाव स्थिर राहिले. चाकणला पालेभाज्यांच्या बाजारात शेपूच्या भाजीची मोठी आवक झाली. मेथी, कोथिंबीर व पालक या पालेभाजीची मात्र किरकोळ आवक झाली. बाजारात एकूण उलाढाल २ कोटी ४५ लाख रुपये झाली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण १ हजार ३२१ क्विंटल आवक झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ४०१ क्विंटलने घटली. त्यामुळे भावात १०० रुपयांची वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव ३ हजार ९०० रुपयांवरून ४ हजार रुपयांवर पोहोचला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक १ हजार १ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक २०१ क्विंटलने घटूनही बटाट्याच्या भावात निम्म्याने वाढ झाली.
बटाट्याचा कमाल भाव ५०० रुपयांवरून १,००० रुपयांवर पोहोचला. जळगाव भुईमूग शेंगाची एकूण आवक २० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ८ क्विंटलने वाढूनही कमाल भाव ५ हजार ५०० रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक २५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १० क्विंटलने वाढूनही लसणाचा कमाल भाव ४ हजारवर स्थिरावला.
चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक ३८० क्विंटल झाली असून, गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक २ क्विंटलने घटली. हिरव्या मिरचीला २ हजार ते ३ हजार रुपयांपर्यंत कमाल भाव मिळाला.

राजगुरुनगर येथील फळभाज्यांच्या बाजारात हिरवी मिरची, कोबी व फ्लॉवरची मोठ्या प्रमाणात आवक झाली. राजगुरुनगरला पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात मेथी, कोथिंबीर व शेपूच्या भाजीची विक्रमी आवक झाली. या बाजारात पालकाची, तर शेलपिंपळगाव येथील उपबाजारात शेपू व पालक भाजीची काहीच आवक झाली नाही.
शेलपिंपळगाव येथील उपबाजारात फळभाज्यांची काहीच आवक झाली नाही. राजगुरुनगर येथील मुख्य बाजारात हिरवी मिरची, कोबी, फ्लॉवर, फरशी व गवार वगळता अन्य फळभाज्यांची फारशी आवक झाली नाही. हिरव्या मिरचीची विक्रमी आवक झाली.
या बाजारात हिरव्या मिरचीला ७५० ते २ हजार रुपयांपर्यंत कमाल भाव मिळाला. या आठवड्यात राजगुरुनगर येथील पालेभाज्यांच्या बाजारात मेथीची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने भाव गडगडले आहेत.

शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव असा :

कांदा - एकूण आवक - १३२१ क्विंटल. भाव क्रमांक १) ४,००० रुपये, भाव क्रमांक २) ३,००० रुपये, भाव क्रमांक ३) १,५०० रुपये. बटाटा - एकूण आवक - १ हजार १ क्विंटल. भाव क्रमांक १) १,००० रुपये, भाव क्रमांक २) ७०० रुपये, भाव क्रमांक ३) ५०० रुपये.
४फळभाज्या : फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती १० किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे : टोमॅटो - १६९ पेट्या ( १,००० ते २,५०० रू. ), कोबी - २३० पोती ( ८०० ते १,६०० रू. ), फ्लॉवर - ३४० पोती ( ४०० ते ८०० रू.), वांगी - ४६० पोती ( १,००० ते २,००० रू.), भेंडी - ३१० पोती ( १,५०० ते २,५०० रू.), दोडका - १९० पोती ( २,००० ते ३,००० रू.), कारली - १८० डाग ( २,००० ते ३,००० रू.), दुधीभोपळा - २१० पोती ( ५०० ते १,००० रू.), काकडी - २३० पोती ( ८०० ते १,२०० रू.), श्रावण घेवडा - ७० पोती ( ४,००० ते ५,००० रू.), वालवर - २७० पोती ( २,००० ते ३,५०० रू.), गवार - ६५ पोती (३,००० ते ४,००० रू.), ढोबळी मिरची - २९० डाग ( २,५०० ते ३,५०० रू.), चवळी - ९५ पोती ( १,००० ते २,००० रू. ), वाटाणा - ४५० पोती ( ३,००० ते ४,००० रू.), शेवगा - १५ पोती ( ९,००० ते १२,००० रू.)
४पालेभाज्या : पालेभाज्यांच्या बाजारात भाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : मेथी - एकूण ३५ हजार ४८० जुड्या ( २०० ते ५००रू.), कोथिंबीर - एकूण २९ हजार ४४० जुड्या ( २०० ते ४०० रू. ), शेपू - एकूण ६ हजार ४५० जुड्या ( ४०० ते ८००रू.), पालक - एकूण ५ हजार ८४० जुड्या ( ३०० ते ५००रू. )
४जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ११० जर्शी गाईंपैकी ७५ गाईंची विक्री झाली. ( २०,००० ते ४५,००० रू. ), २३५ बैलांपैकी १७५ बैलांची विक्री झाली. ( १५,००० ते २५,००० रू.), १५१ म्हशींपैकी ११३ म्हशींची विक्री झाली. ( २०,००० ते ६०,००० रू.), शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ४,९३० शेळ्या - मेंढ्यांपैकी ४,६१० मेढ्यांची विक्री होऊन त्यांना २,००० ते १०,००० रुपये इतका भाव मिळाला.

Web Title:  Potatoes, onions, green chilli and onion prices rose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.