आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर खड्डे, दौंडज, वाल्हे परिसरात जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 01:32 AM2018-09-27T01:32:26+5:302018-09-27T01:32:57+5:30
आळंदी-पंढरपूर पालखीमार्ग असल्यामुळे केंद्र शासनाने ताब्यात घेतला आहे. आता तो सहापदरी होणार आहे. मात्र रस्त्याची दारुण अवस्था काही संपत नसून दौंडज व वाल्हे परिसरात रस्त्यावरील भरपूर खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असतात.
वाल्हे - आळंदी-पंढरपूर पालखीमार्ग असल्यामुळे केंद्र शासनाने ताब्यात घेतला आहे. आता तो सहापदरी होणार आहे. मात्र रस्त्याची दारुण अवस्था काही संपत नसून दौंडज व वाल्हे परिसरात रस्त्यावरील भरपूर खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असतात. प्रवास जीवघेणा ठरत आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा या रस्त्याने पंढरपूरला जात असतो त्यामुळे दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी चार महिन्यापूर्वी हा संपूर्ण आळंदी ते पंढरपूर रस्ता दुरुस्त केला होता.तरी ही हा रस्ता चार महिन्यात एवढा खराब झाला आहे तो पाहवत नाही.खड्डे चुकवण्यात नादात या रस्त्यावर बरेच अपघात झाले आहेत कित्येक जणांचे बळी गले आहेत.
मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.याच मार्गावर महाराष्ट्रचे कुलदैवत खंडेरायाची जेजुरी असल्यामुळे भाविकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. त्याच बरोबर जेजुरी एमआयडीसी असल्यामुळे नीरा, जेऊर, मांडकी, वीर, हरणी, पिंगोरी, सुकलवाडी, दौडज ग्रामीण भागातील कामगार मोठया संख्येने मोटर सायकल वर कामावर जात आहेत.
जेजुरी, सासवड या ठिकाणी कॉलेजला जाणार मोठा वर्ग आहे.या रस्त्यावर काही विध्यार्थी, एमआयडीसी चे कामगार ही अपघात मृत्यू मुखी पडले आहेत.पालखी मार्ग म्हणून दरवर्षी ज्या ठेकेदाराकडून शासन कामे करून घेत असते तो रस्ता कमीत कमी वर्षभर तरी चागला राहावा अशी ग्रामस्थां मध्ये चर्चा आहे. लवकरात लवकर पशासनाने रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.