PIFF:‘बिट्वीन टू डॉन्स’ला प्रभात आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार; संत तुकाराम उत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कारावर ‘पोटरा’ ची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 01:50 PM2022-03-11T13:50:25+5:302022-03-11T13:50:32+5:30

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर सलमान नाकर दिग्दर्शित ’बिट्वीन टू डॉन्स' या चित्रपटाने नाव कोरले तर ५ लाख रुपयांचा ‘संत तुकाराम उत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार’ शंकर धोत्रे दिग्दर्शित ‘पोटरा’ने पटकाविला

Potra wins Sant Tukaram Best Marathi Film Award in piff | PIFF:‘बिट्वीन टू डॉन्स’ला प्रभात आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार; संत तुकाराम उत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कारावर ‘पोटरा’ ची बाजी

PIFF:‘बिट्वीन टू डॉन्स’ला प्रभात आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार; संत तुकाराम उत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कारावर ‘पोटरा’ ची बाजी

Next

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राज्य शासनाच्या १० लाख रुपयांच्या  ‘प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर सलमान नाकर दिग्दर्शित ’बिट्वीन टू डॉन्स' या चित्रपटाने नाव कोरले तर ५ लाख रुपयांचा ‘संत तुकाराम उत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार’ शंकर धोत्रे दिग्दर्शित ‘पोटरा’ने पटकाविला. गेल्या आठवडाभरापासून पुण्यात रसिकांना देशविदेशातील चित्रपटांची पर्वणी देणा-या ’पिफ २०२२’ चा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे ज्येष्ठ दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील पटकथाकार रुमी जाफरी आणि पिफ'चे संचालक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते पार पडला.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार निखिल महाजन यांना  ‘गोदावरी' या चित्रपटासाठी तसेच उत्कृष्ट पटकथा पुरस्कार ‘पोटरा’ या चित्रपटासाठी शंकर अर्जुन धोत्रे यांना मिळाला. उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार ‘निवास' या चित्रपटासाठी रमेश भोसले आणि शमीन कुलकर्णी यांना ‘गोदावरी’  या चित्रपटासाठी विभागून देण्यात आला. उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार छकुली देवकर हिला ‘पोटरा' या चित्रपटासाठी
तर उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार ‘दिलीप प्रभावळकर’ यांना ‘आता वेळ झाली' या चित्रपटासाठी मिळाला. संगीताचा विशेष ज्युरी पुरस्कार ‘गोदावरी'साठी ए. व्ही. प्रफुल्लचंद्र  यांना पटकाविला.

उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक पुरस्कार ‘१०७ मदर्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक पीटर केरकेस यांना मिळाला. हा चित्रपट युक्रेनमध्ये चित्रित करण्यात आला आहे. पीटर यांनी ऑनलाईन प्रतिक्रिया देताना युक्रेनियन टीमची आठवण काढली आणि त्यांच्या टीमपैकी काहीजण कीव्हमध्ये बॉम्ब वर्षावाचा सामना करीत असल्याचे सांगितले. एमआयटी ह्युमन स्पिरिट पुरस्कार अलेक्सी जर्मन ज्युनिअर दिग्दर्शित ‘हाऊस अरेस्ट’ या रशियन चित्रपटाला तर ‘प्ले ग्राउंड' या चित्रपटातील ‘नोरा' या भूमिकेसाठी माया वांडरबेक यांना आणि ’इरेजिंग फ्रँक’ या चित्रपटाचे दिग्दर्शक गेबोर फेब्रिशिअस यांना विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला.

‘‘चित्रपट महोत्सवामध्ये इतर चित्रपट दिग्दर्शकांना आपले चित्रपट दाखवता येतात आणि प्रेक्षकांशी थेट संवाद साधता येतो.  प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांमधून आपण चित्रपट शिकत जातो. त्यामुळे चित्रपट महोत्सव गरजेचे आहेत असे ज्येष्ठ दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांनी सांगितले आहे.''  

Web Title: Potra wins Sant Tukaram Best Marathi Film Award in piff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.