राज्यात शक्ती कायदा अंमलात आणणार - देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:11 AM2021-01-18T04:11:08+5:302021-01-18T04:11:08+5:30

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे आयोजित चार दिवसीय दुसऱ्या राष्ट्रीय महिला संसदेच्या समारोप समारंभ प्रसंगी देशमुख ...

Power Act to be implemented in the state - Deshmukh | राज्यात शक्ती कायदा अंमलात आणणार - देशमुख

राज्यात शक्ती कायदा अंमलात आणणार - देशमुख

Next

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे आयोजित चार दिवसीय दुसऱ्या राष्ट्रीय महिला संसदेच्या समारोप समारंभ प्रसंगी देशमुख व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलत होते. यावेळी झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुरमू, समाजसेविका मेधा पाटकर, युकेच्या हाउस ऑफ लॉर्डच्या सदस्या संदीप के. वर्मा, इस्त्रोच्या शास्त्रज्ञ डॉ.रितू श्रीवास्तव, खासदार प्रणित कौर, खासदार अनुप्रिया पटेल, एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विश्वनाथ कराड, युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ.एन. टी. राव उपस्थित होते.

अनिल देशमुख म्हणाले, शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीमुळे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला लगाम लावला जाईल, तसेच पीडित महिलांना लवकर न्याय मिळेल. गँग रेप, अ‍ॅसिड अटॅक व बलात्कारप्रकरणी गुन्हेगारांना काही वर्षांचा तुरुंगवास किंवा आजीवन कारवाई होण्याची शिक्षा दिली जात असे, परंतु शक्ती कायद्यानुसार गुन्हा सिद्ध झाल्यास सरळ मृत्युदंडाची शिक्षा देण्यात येईल. सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यास २ वर्षांचा तुरुंगवास आहे, तसेच महिलांकडून खोटी तक्रार दाखल केल्याचे सिद्ध झाल्यास तिला १ किंवा २ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल. सर्व कायदे जरी महिलांच्या सुरक्षेसाठी असले, तरी समाज आणि कुटुंबांनी त्यांना मूल्यवान समजून आदर आणि सन्मान द्यायला हवा.

द्रौपदी मुरमू, मेधा पाटकर, अनुप्रिया पटेल, प्रणित कौर, संदीप के.वर्मा, डॉ.विश्वनाथ दा. कराड, राहुल कराड यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.एन. टी. राव यांनी प्रास्ताविक केले. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन तर रवींद्रनाथ पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Power Act to be implemented in the state - Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.