कोरेगावमूळमध्ये महाविकास आघाडीची सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:12 AM2021-01-20T04:12:14+5:302021-01-20T04:12:14+5:30

कोरेगावमूळ येथील ग्रामपंचायतीच्या १३ पैकी ८ जागांवर बापूसाहेब बोधे व विठ्ठल शितोळे यांच्या महाविकास आघाडी पॅनेल व सुरेश कानकाटे, ...

Power of Mahavikas Aghadi in Koregaonmul | कोरेगावमूळमध्ये महाविकास आघाडीची सत्ता

कोरेगावमूळमध्ये महाविकास आघाडीची सत्ता

googlenewsNext

कोरेगावमूळ येथील ग्रामपंचायतीच्या १३ पैकी ८ जागांवर बापूसाहेब बोधे व विठ्ठल शितोळे यांच्या महाविकास आघाडी पॅनेल व सुरेश कानकाटे, बापूसाहेब शितोळे, विलास कानकाटे यांच्या श्री भैरवनाथ पॅनेलमध्ये प्रामुख्याने लढत झाली. या लढतीत सर्व आठ जागा महाविकास आघाडीने पटकाविल्या आहे. तर यापूर्वी महाविकास आघाडीचे प्रभाग क्र. ४ मधून बापूसाहेब बोधे, विठ्ठल शितोळे व अश्विनी चिंतामण कड हे बिनविरोध निवडून गेले होते. श्री भैरवनाथ पॅनेलचे प्रभाग क्र. ५ मधून मंगेश अशोक कानकाटे, पल्लवी रमेश नाझरकर हे बिनविरोध निवडून आले होते. या निवडणुकीत बापूसाहेब बोधे व त्यांच्या पत्नी लिलावती बोधे हे दोघेही ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून दाखल झाले आहेत.

--

प्रभागनिहाय विजयी झालेले उमेदवार

प्रभाग १ - भानुदास खंडेराव जेधे , वैशाली अमित सावंत (महाविकास आघाडी). प्रभाग २ - दत्तात्रय ज्ञानेश्वर काकडे, लिलावती बापूसाहेब बोधे, राधिका संतोष काकडे (महाविकास आघाडी). प्रभाग ३ - मनीषा नंदकिशोर कड, मंगल जगन्नाथ पवार, सचिन गुलाब निकाळजे (महाविकास आघाडी). प्रभाग क्र. ४ - बापूसाहेब बोधे, विठ्ठल शितोळे व अश्विनी चिंतामण कड हे महाविकास आघाडीचे उमेदवार बिनविरोध निवडून गेले आहेत. प्रभाग क्र ५ - मंगेश अशोक कानकाटे, पल्लवी रमेश नाझरकर.

Web Title: Power of Mahavikas Aghadi in Koregaonmul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.