शेलपिंपळगाव येथे वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:08 AM2021-07-15T04:08:24+5:302021-07-15T04:08:24+5:30

अलीकडच्या काळात वातावरणात बदल होत असून सातत्याने मोठं-मोठी चक्रीवादळे निर्माण होऊ लागली आहेत. त्यादरम्यान वळीवसदृश भीतीदायक मुसळधार पाऊस पडत ...

Power outage system in operation at Shelpimpalgaon | शेलपिंपळगाव येथे वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित

शेलपिंपळगाव येथे वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित

Next

अलीकडच्या काळात वातावरणात बदल होत असून सातत्याने मोठं-मोठी चक्रीवादळे निर्माण होऊ लागली आहेत. त्यादरम्यान वळीवसदृश भीतीदायक मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातच महाराष्ट्रात वारंवार हवेचा दाब कमी होत असल्याने पावसादरम्यान ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटासह जास्त प्रमाणात होत आहे. परिणामी, आकाशातून वीज जमिनीवर कोसळण्याचा धोका वाढत चालला आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने विविध ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार गावागावांमध्ये वीज अटकाव केंद्र उभारण्यास सहमती दर्शवली आहे. या अनुषंगाने शेलपिंपळगाव येथे वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या केंद्राचे आमदार दिलीप मोहिते - पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरपंच विद्या मोहिते, उपसरपंच संदीप मोहिते, ग्रामविकास अधिकारी उत्तम कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी वायरमन सूरज जाधव, संतोष महामुनी, सुनील मोहिते, शरद मालपोटे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, या वीज अटकाव यंत्रणेपासून गोलाकार आठशे मीटर परिसर वीजमुक्त होणार आहे. त्यामुळे आकाशातून पडणाऱ्या विजेमुळे होणारी मनुष्य व वित्तहानी टाळण्यासाठी अधिक मदत होणार असल्याचे सरपंच विद्या मोहिते यांनी सांगितले.

शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे वीज अटकाव यंत्रणेचे उद्घाटन करताना मान्यवर.

Web Title: Power outage system in operation at Shelpimpalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.