कोरोनाग्रस्त रुग्णांची वीज तोडली-रुग्णांचे पाण्याविना हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:12 AM2021-03-28T04:12:02+5:302021-03-28T04:12:02+5:30

कर्वेनगरमधील एका कोविड ग्रस्त रुग्ण दाम्पत्य राहत असलेल्या इमारतीचा वीजपुरवठा बिल भरणा न केल्याचा कारणास्तव महावितरणने खंडीत केला. यामुळे ...

Power outages of coronary patients - patients without water | कोरोनाग्रस्त रुग्णांची वीज तोडली-रुग्णांचे पाण्याविना हाल

कोरोनाग्रस्त रुग्णांची वीज तोडली-रुग्णांचे पाण्याविना हाल

Next

कर्वेनगरमधील एका कोविड ग्रस्त रुग्ण दाम्पत्य राहत असलेल्या इमारतीचा वीजपुरवठा बिल भरणा न केल्याचा कारणास्तव महावितरणने खंडीत केला. यामुळे ज्येष्ठ नागरिक असलेल्या या रुग्णांना दोन दिवस पाण्याविना काढावे लागले आहेत.

येथील शाहू कॉलनी १नंबर गलल्लीत हे भालेकर दांपत्य (नाव बदललेले आहे) राहतात. गेल्या आठवड्यात त्यांचा कोरोनाची लागण झाली होती. गृह विलगिकरणाचा कालावधी देखील पूर्णत्वास आला आहे. त्यांच्या इमारतीचे कॉमन मीटरचा वीजपुरवठा शुक्रवारी दुपारी तोडण्यात आला. महावितरणच्या डहाणूकर कॉलनी विभागाने ही 'अदभुत' कामगिरी केली.

पण विजेअभावी या इमारतीचे पाण्याचे मोटर व इमारतीची सामायिक प्रकाश व्यवस्था बंद पडली, तसेच सुरक्षा रक्षक यांच्या खोलीत देखील अंधार पडला.

यामुळे गृहविलगिकरणात राहत असलेले भालेकर दाम्पत्याना वरच्या मजल्यावरून पाण्यासाठी विलगिकरणात नियम मोडून इमारतीच्या तळमजल्यावर यावे लागले. याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर आवाज उठवल्यावर माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची व्यथा जाणून घेतली.

-------------

इमारतीस नाही पूर्णत्व

या इमारतीत काही कामे अद्याप पूर्ण झालेली नाही. याबाबत विकसक व सदस्यांमध्ये काही बाबतीत विवाद असल्याचे व इमारतीवरील मोबाईल टॉवरला विरोध असल्याचे दिसून येत आहे.

------------------------

या इमारतीचे सहा ते सात हजार बिल थकीत होते. कोरोनाग्रस्त रुग्ण येथे असल्याचे माहीत नव्हते. लवकरच वीजपुरवठा पूर्ववत करू. या आठवड्यात एका कॅन्सरग्रस्त रुग्णास देखील पुरवठा खंडीत न करता बिल भरण्याबाबत मुभा दिली होती. नागरिकांनी आपल्या विभागास पूर्व कल्पना दिल्याशिवाय आम्हास रुग्ण असल्याचे कसे कळेल?

- सुहास गवळी, उपअभियंता कोथरूड विभाग

-------------

फोटो ओळ कर्वेनगर मधील या इमारतीच्या वीजपुरवठा खंडित केल्याने कोरोनाग्रस्त रुग्णांची हेळसांड झाली.

Web Title: Power outages of coronary patients - patients without water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.