एक हजार ४१५ गावांचा वीजपुरवठा पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:10 AM2021-05-20T04:10:38+5:302021-05-20T04:10:38+5:30

बारामती : कोरोनासारख्या महामारीमुळे सारे जग थांबले असतानाही वीज कर्मचारी मात्र अखंडित वीजपुरवठ्यासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यातच ‘तौक्ते ...

Power supply to 1,415 villages restored | एक हजार ४१५ गावांचा वीजपुरवठा पूर्ववत

एक हजार ४१५ गावांचा वीजपुरवठा पूर्ववत

Next

बारामती : कोरोनासारख्या महामारीमुळे सारे जग थांबले असतानाही वीज कर्मचारी मात्र अखंडित वीजपुरवठ्यासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यातच ‘तौक्ते चक्रीवादळाने’ विस्कळीत झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अविरत प्रयत्नांमुळे बारामती परिमंडलाने सोलापूर, सातारा व बारामती मंडलातील ९५ टक्क्यांहून अधिक भागात वीजपुरवठा पूर्ववत करण्यास यश मिळवले आहे. प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्यासह सर्व अधीक्षक अभियंते परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आवश्यक त्या भागात अतिरिक्त मनुष्यबळ देऊन काम वेळेत करण्याला प्राधान्य दिले आहे. त्यांना लागणारे साहित्य व साधने मुबलक दिली आहेत. मात्र, वादळी वारे व पावसामुळे त्यात अडथळे येत असून, त्यावर मात करत काम सुरू आहे.

‘तौक्ते’ चक्रीवादळाने बारामती परिमंडलातील ५६ वीज उपकेंद्रांना ठप्प केले होते. मात्र महावितरणने यंत्रणा युद्धपातळीवर राबवून सर्व वीज उपकेंद्रे व त्यातून निघणाऱ्या वीज वाहिन्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळवले आहे. कोरोना रुग्णालये, केअर सेंटर, ऑक्सिजन प्लान्ट आदी अत्यावश्यक सेवांचा वीजपुरवठा काही तासांतच सुरू केला होता. यामध्ये ५४ उपकेंद्रे दुसऱ्याच दिवशी सुरू झाली. मात्र महाबळेश्वरमधील वेण्णालेक व कोळीआळी जीआयएस उपकेंद्रे सुरू होण्यास वारंवार अडथळे येत होते. काल रात्री उशिरा हे दोन्ही उपकेंद्रे पूर्ववत झाली.

बारामती परिमंडलात सात लाख २४ हजार ३८८ ग्राहकांचा वीजपुरवठा चक्रीवादळाने विस्कळीत झाला होता. बुधवारी दुपारपर्यंत सात लाख १२ हजार ४२० ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला. त्यासाठी ६२३ विजेचे खांब उभे करण्यात आले. बाधित झालेल्या एक हजार ४३८ पैकी एक हजार ४१५ गावांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे. तर अद्याप गावाबाहेर, डोंगरात वस्तीकरून राहिलेल्या १४५ रोहित्रांचा वीजपुरवठा पूर्ववत करणे बाकी आहे.

-------------------

बारामती परिमंडलात चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका सातारा जिल्ह्याला बसला आहे. सातारा जिल्ह्यातील चार लाख ५४ हजार ५९५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यातील चार लाख ४२ हजार ७५८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. अद्याप महाबळेश्वर व पाचगणी भागातील आठ हजार व कराड विभागातील तीन हजार १०० ग्राहकांच्या वीजपुरवठ्याचे काम युद्‌धपातळीवर सुरु आहे. याकामी महावितरणचे व ठेकेदारांचे मनुष्यबळ अहोरात्र परिश्रम घेत आहे.

१९ बारामती महावितरण

वादळानंतर वीज यंत्रणेच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेताना महावितरणचे अधिकारी.

Web Title: Power supply to 1,415 villages restored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.