बांधकाम व्यावसायिकामुळे सोसायटीचा वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:09 AM2021-04-11T04:09:59+5:302021-04-11T04:09:59+5:30

याबाबत सोसायटीचे पदाधिकारी मंगेश बनकर, प्रशांत शिंदे, भीमाशंकर डेंगळे, सतीश उफाडे, अभिजित सोनसळे आदी सदनिका धारकांनी चाकण पोलीस ठाण्यात ...

The power supply of the society was cut off due to the builder | बांधकाम व्यावसायिकामुळे सोसायटीचा वीज पुरवठा खंडित

बांधकाम व्यावसायिकामुळे सोसायटीचा वीज पुरवठा खंडित

Next

याबाबत सोसायटीचे पदाधिकारी मंगेश बनकर,

प्रशांत शिंदे, भीमाशंकर डेंगळे, सतीश उफाडे,

अभिजित सोनसळे आदी सदनिका धारकांनी चाकण पोलीस ठाण्यात संबधित बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात लेखी तक्रारी अर्ज सादर केला आहे.

यावेळी सदनिका धारकांनी सांगितले की, चाकण येथील एकतानगरमध्ये आर्ची नोव्हा असोसिएट या बांधकाम कंपनीने ९६ सदनिका असलेली श्रीहरी रेसिडेन्सी नावाचा गृहनिर्माण प्रकल्प बांधला आहे. मात्र अनेक गैरसोयीने येथील सदनिका धारकांना जेरीस आणले आहे. यामुळे त्यांनी बांधकाम व्यवसायिकांच्या विरोधात तक्रारी अर्ज दाखल केला आहे.

वीज बिल थकल्याने मागील पंधरा दिवसांपासून सोसायटीचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. त्यामुळे तेथील रहिवासी, लहान मुलांचे उकाड्याने हाल होत आहेच पण पाण्याची गैरसोय झाली आहे. करारामध्ये उल्लेख केलेल्या पाण्याच्या टाक्या,लिफ्टचे कोणतेही काम केलेले नाही, अंतर्गत रस्ता, वाल कंपाऊंड, रंगकाम, गार्डन, मंदिर व सुरक्षा कठडे आदी कामे बांधकाम व्यावसायिकाने अपूर्ण अवस्थेत ठेवल्याचेही समोर आले आहे.

Web Title: The power supply of the society was cut off due to the builder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.