बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार येथे एक महिन्यापासून शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 07:24 PM2021-05-28T19:24:21+5:302021-05-28T19:40:15+5:30
शेतकऱ्यांची तातडीने दुरुस्तीची मागणी
उंडवडी कडेपठार: गेल्या एक महिन्यापासून बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार येथील गावठाणात शेतीपंपाची थ्री फेज लाईन रोहिञ एक महिन्यापासून जळाल्याने येथील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ते तातडीने दुरूस्तीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांनी अनेकदा संबंधितांशी संपर्क करुन माहिती दिली. आज दुरुस्ती होईल, उद्या दुरुस्ती होईल अशी उत्तरे संबधितांकडून शेतक-यांना मिळत आहेत. एक महिना होऊनही जळालेली रोहिञ दुरूस्ती करण्यात आली नाही. या जळालेल्या रोहिञावर जवळपास २२ शेतकऱ्यांचे कनेक्शन असून सध्या शेतीमध्ये मका,कडबा,भूईमुग पिक आहे. तसेच इतर पिके शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत झाल्याने पाणी असून देखील काही पिके जळण्याच्या मार्गावर आहेत.
तर काही पिके पूर्णपणे जळुन गेली आहे. त्याच बरोबर गावात पाणी टंचाई असल्यामुळे त्या ठिकाणच्या बोरवेल, विहिरींचे पाणी शेतकऱ्यांनी घरी पिण्यासाठी,जनावरांना पिण्यासाठी तसेच घरी वापरासाठी पाईपलाईनच्या माध्यमातून आणले आहे. एक महिना होऊन देखील महावितरणाने याकडे दुर्लक्ष केल्याने वीजपुरवठा सुरळीत न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानाची भरपाई महावितरणाने शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.