वाघोलीला पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:11 AM2021-03-25T04:11:39+5:302021-03-25T04:11:39+5:30
वाघोली : ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा 下करणाºया载 下वढू载 येथील पाणीपुरवठा योजनेचे 下विजबिल载 थकल्याने वीज वितरण कंपनीकडून पाणी पुरवठा योजनेचे वीज कनेक्शन ...
वाघोली : ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा 下करणाºया载 下वढू载 येथील पाणीपुरवठा योजनेचे 下विजबिल载 थकल्याने वीज वितरण कंपनीकडून पाणी पुरवठा योजनेचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. पाणी पुरवठा योजनेचे वीज कनेक्शन अचानक तोडल्यामुळे 下वाघोलीकरांमध्ये载 महावितरण विरोधात असंतोषाचे वातावरण आहे.
महावितरण कंपनीकडून कोणतीही पूर्व सूचना किंवा नोटीस न देता कनेक्शन तोडल्याने वाघोली पंचायत कडून नाराजी व्यक्त केली जात आहे. वाघोली ग्रामपंचायत आणि पाणीपुरवठा योजनेचे एकूण अंदाजे 下९२载 लाखाच्या आसपास बिल थकीत होते. त्यापैकी सुमारे 下७५载 लाख रुपये बिल ग्रामपंचायतीकडून भरण्यात आले आहे. उर्वरित बिल टप्प्याटप्प्याने भरण्यासाठी 下३०载 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात यावी, असे लेखी पत्रदेखील ग्रामपंचायतीकडून देण्यात आले होते. परंतु महावितरणने कोणतीही पूर्वकल्पना न देता वीज कनेक्शन तोडले आहे, अशी माहिती वाघोली ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी अनिल कुंभारे यांनी दिली.
***************
महावितरण कंपनीचे काही बिल ग्रामपंचायतीकडून भरण्यात आले आहे. वीज कनेक्शन तोडण्याआधी ग्रामपंचायतीला पूर्वकल्पना देणे गरजेचे होते. परंतु महावितरणचा मनमानी पद्धतीने कारभार चालू असून सध्या उन्हाळ्याच्या दिवसात महावितरणकडून वीज कनेक्शन तोडण्याचा चाललेला प्रकार अत्यंत चुकीचा आहे. महावितरणने सर्वांना सहकार्य करावे.
- रामभाऊ दाभाडे,माजी जिल्हा परिषद सदस्य
*************
**चौकट**
वाघोलीला पाणी पुरवठा योजनेचे वीज कनेक्शन तोडल्यानंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांची वीज बिलाबाबत व वीज कनेक्शन तोडल्याबाबत माहिती घेण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, कोणत्याही अधिकाºयांशी संपर्क होऊ शकला नाही. वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांशी संपर्क न होण्याचा हा पहिलाच प्रकार नसून आधीही अनेक वेळा वीज वितरण कंपनीचे अधिकारी प्रतिसाद देत नसल्याचे आढळून आले आहे.