यवत ग्रामपंचायतीची वीजजोड तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:09 AM2021-06-26T04:09:47+5:302021-06-26T04:09:47+5:30
यवत उपविभागाचे सहाय्यक अभियंता प्रकाश काकडे म्हणाले, यवत ग्रामपंचायतकडे मागील अनेक वर्षांपासून थकबाकी आहे. सध्या ही थकबाकी २ कोटी ...
यवत उपविभागाचे सहाय्यक अभियंता प्रकाश काकडे म्हणाले, यवत ग्रामपंचायतकडे मागील अनेक वर्षांपासून थकबाकी आहे. सध्या ही थकबाकी २ कोटी रुपयांच्याजवळ पोहोचली आहे. वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार वीज जोडणी तोडली आहे.
ग्रामपंचायतीकडे पाणीपुरवठा व पथ दिव्यांसाठी २७ वीज कनेक्शन आहेत. आता थकीत वीज बिलमुळे सर्वच वीज जोडण्या तोडण्यात आल्याने रात्रीच्या वेळी सर्व रस्त्यावर अंधकार होणार आहे. तर नळ पाणीपुरवठा करणारी कनेक्शन खंडित केल्याने गावातील पाणीपुरवठा थांबणार आहे.
चौकट
मागील दीडवर्षांपासून कोरोना महामारीशी गावे लढत आहेत. या काळात ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी वसुली बंद असल्याने विकास कामांना बगल दिली. जेवढा निधी आहे, त्यातून कामगारांचे पगार, कोरोना विषयक कामांवर खर्च केले.
सरपंच झाल्यावर मार्चमध्ये थकीत बिलापैकी ४ लाख ५० हजार रूपये भरले. मात्र, महावितरणने थकीत बिलासाठी ग्रामपंचायतची पाणीपुरवठा वीजकनेक्शन तसेच स्ट्रीटलाईट कनेक्शन कट केलं आहे. त्यामुळे आम्ही कनेक्शन पूर्वरत होईपर्यंत पाणी व पथदिवे पुन्हा सुरू करू शकत नाही. सध्या कोरोनाचा काळ हा भयंकर आहे. पण आमचा नाइलाज आहे. तरी नागरिकांनी आपली थकीत व चालू पाणीपट्टी व घरपट्टी भरून ग्रामपंचायतीस सहकार्य करावे.
-समीर दोरगे, सरपंच, यवत