वीज ट्रान्सफॉर्मर चोरांचा सुळसुळाट
By admin | Published: July 23, 2015 04:54 AM2015-07-23T04:54:09+5:302015-07-23T04:54:09+5:30
वीज कंपनीच्या सोमेश्वरनगर उपविभाग ट्रान्सफॉर्मर आणि वीजपंप चोरांचा सुळसुळाट झाला आहे. मागील सहा महिन्यांत चोरट्यांनी
सोमेश्वरनगर : वीज कंपनीच्या सोमेश्वरनगर उपविभाग ट्रान्सफॉर्मर आणि वीजपंप चोरांचा सुळसुळाट झाला आहे. मागील सहा महिन्यांत चोरट्यांनी तब्बल सत्तावीस ट्रान्सफॉर्मर लंपास केले आहेत. यामुळे कंपनीचे सुमारे सत्तावीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. चोरट्यांनी एकाच ठिकाणचा ट्रान्सफॉर्मर दोन-दोन वेळा चोरून पोलिसांनाच आव्हान
दिले आहे.
जानेवारीमध्ये चोरट्यांनी मोरगाव, मोरगावनजीक गडदेमळा येथील मल्लिकार्जुन विद्युत रोहित्र लंपास केले. फेब्रुवारीत चोरी झाली नाही. मात्र, मार्चमध्ये प्रमाण वाढले. त्या महिन्यात गडदरवाडीतील करंजेमळा, खंडोबाचीवाडी येथील विद्युत रोहित्राची चोरी झाली. एकट्या निंबूत गावातील शामकाका विद्युत रोहित्राची, आंब्याचा मळा क्रमांक-१, आंब्याचा मळा क्रमांक-२, वेताळ, प्रियराज काकडे विद्युत रोहित्राची, बाळूभय्या काकडे विद्युत रोहित्र, अतिरिक्त विद्युत रोहित्र व केवड्याचा ओढा येथील ८ विद्युत रोहित्रे लंपास केली आहेत. याच वेळी सस्तेवाडी येथील अहिरकर विद्युत रोहित्राचीदेखील चोरी झाली होती. एप्रिलमध्ये चोरट्यांनी निंबूतमधीलच गुरुदत्त पाणीपुरवठा विद्युत रोहित्र पळविले.
मे महिन्यात पुन्हा करंजे येथील शामराव रासकर, सुपे येथील दिवटे, खंडोबाचीवाडी येथील पांडुळे, भापकरमळा येथील विद्युत रोहित्र क्रमांक २ या चार विद्युत रोहित्रे लंपास केली. जूनमध्ये सत्र कायम ठेवताना चोरट्यांनी भापकरमळा क्रमांक १, करंजेपूल येथील कांतिकाका, पालथा नाला, चारमोरा डीपी, कोंढाळकर, देऊळवाडी, चौधरवाडी विद्युत रोहित्र लंपास केले. शनिवारी (दि. ११) पहाटे चोरट्यांनी वाघळवाडी येथील ट्रान्स्फॉर्मर चोरट्यांनी लंपास केला.
या प्रकारामुळे आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार हेमंत गायकवाड, रूपचंद शेंडकर, चारुहास शिंदे आदींनी केली आहे. याबाबत वीज कंपनीचे अधिकारी दत्तात्रेय बालगुडे व संतोष पंचरस यांनी, एका डीपीमागे आमचे एक लाख रुपयांचे नुकसान होत असल्याचे सांगितले.
(वार्ताहर)