वृत्तपत्र विक्रेत्यांना लसीकरणाचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:09 AM2021-04-27T04:09:56+5:302021-04-27T04:09:56+5:30

पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या विशेष प्रयत्नांमधून, आमदार सिद्धार्थ शिरोळे व रेडिंग टाेन कंपनी, सुनील पांडे यांच्या सहयोगाने व जोशी ...

The power of vaccination to newspaper vendors | वृत्तपत्र विक्रेत्यांना लसीकरणाचे बळ

वृत्तपत्र विक्रेत्यांना लसीकरणाचे बळ

Next

पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या विशेष प्रयत्नांमधून, आमदार सिद्धार्थ शिरोळे व रेडिंग टाेन कंपनी, सुनील पांडे यांच्या सहयोगाने व जोशी हाॅस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंद्रकांत बर्वे , प्रशासकीय अधिकारी विजय अग्रवाल , माधुरी काकिर्डे यांच्या माध्यमातून हा लसीकरणाचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे, वरिष्ठ उपाध्यक्ष दत्तात्रय पिसे, सचिव अरुण निवंगुणे, विश्वस्त राहूल चिंचकर, कैलास नाकते हे पदाधिकारी व विक्रेते बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. ९३७००३६४६८

संघाचे अध्यक्ष विजय पारगे म्हणाले, सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या मोठ्या संकटकाळातही सदैव सेवेस सज्ज या तत्परतेने, आपले ‘पेपरदूत’ घरोघरी वृत्तपत्र पोहोचविण्याची जबाबदारी नियमित पार पाडत आहेत. विक्रेत्यांची काळजी घेताना, वृत्तपत्र विक्री केंद्रांचे वारंवार निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) केले जात आहे. तसेच विक्रेत्यांना मास्कचे वाटपही केले गेले आहे.

कोट :

वृत्तपत्र विक्रेता हा स्वत:बरोबरच कुटुंबाची तसेच वाचकांचीही काळजी घेऊन आणि आवश्यक ती खबरदारी घेऊन आपली सेवा बजावत आहे. लसीकरणाबरोबरच मास्क, सॅनिटायझर, हॅण्डग्लोव्हज या सुरक्षाासाधनांचा वापर करुन तसेच सामाजिक अंतर ठेवून आपला व्यवसाय करीत आहे. त्यामुळे तो सुरक्षित आहे.

- विजय पारगे, अध्यक्ष, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ

———————————

Web Title: The power of vaccination to newspaper vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.