संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार प्रभाकर करंदीकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 04:07 AM2018-09-23T04:07:29+5:302018-09-23T04:09:32+5:30
मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार आणि भरत नाट्य संशोधन मंदिर संस्थेचे माजी अध्यक्ष प्रभाकर करंदीकर (वय ८४) यांचे प्रदीर्घ आजाराने शुक्रवारी रात्री निधन झाले.
पुणे - मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार आणि भरत नाट्य संशोधन मंदिर संस्थेचे माजी अध्यक्ष प्रभाकर करंदीकर (वय ८४) यांचे प्रदीर्घ आजाराने शुक्रवारी रात्री निधन झाले. त्यांच्यामागे तीन विवाहित मुली आहेत. पार्थिवावर शनिवारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
ज्येष्ठ गायक पं. यशवंतबुवा मराठे आणि नंतर स्वरराज छोटा गंधर्व यांच्याकडून करंदीकर यांनी शास्त्रीय संगीताची तालीम घेतली. भरत नाट्य मंदिर, सेंट्रल रेल्वे कल्चरल
अकादमी, मराठी रंगभूूमीच्या माध्यमातून त्यांनी संगीत रंगभूमीवर सुमारे पाचशेहून अधिक प्रयोग सादर केले.
‘सौभद्र’, ‘मंदारमाला’, ‘स्वयंवर’, ‘संशयकल्लोळ’, ‘वैरीण झाली सखी’, ‘शाहीर प्रभाकर’ आणि ‘अभोगी’ या संगीत नाटकांमध्ये प्रमुख भूमिका केल्या होत्या. राज्य संगीत नाट्य स्पर्धेत सलग तीन वर्षे सुवर्णपदक पटकावण्याचा बहुमानही त्यांनी संपादन केला होता.
पुणे महानगरपालितर्फे बालगंधर्व पुरस्काराने त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला होता. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी नरूभाऊ लिमये यांच्यानंतर भरत
नाट्य संशोधन मंदिराच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी अनेक वर्षे सांभाळली.