प्रभागरचनेत जुनीच पद्धत अवलंबण्याचे गौडबंगाल

By admin | Published: October 12, 2016 03:08 AM2016-10-12T03:08:26+5:302016-10-12T03:08:26+5:30

महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना करण्याचे काम सॉफ्टवेअरच्या मदतीने पार पाडले जाणार आहे, त्यामुळे त्यामध्ये होणारा मानवी हस्तक्षेप टाळला

Prabharganchane has adopted the old method of Godavanganchal | प्रभागरचनेत जुनीच पद्धत अवलंबण्याचे गौडबंगाल

प्रभागरचनेत जुनीच पद्धत अवलंबण्याचे गौडबंगाल

Next

दीपक जाधव / पुणे
महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना करण्याचे काम सॉफ्टवेअरच्या मदतीने पार पाडले जाणार आहे, त्यामुळे त्यामध्ये होणारा मानवी हस्तक्षेप टाळला जाणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले होते. निवडणूक आयोगाकडील या सॉफ्टवेअरच्या यशस्वी चाचण्याही घेण्यात आल्या होत्या; मात्र राजकीय दबाव वाढल्यामुळे निवडणूक आयोगाला सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रभागरचना करण्याचा निर्णय ऐनवेळी रद्द करावा लागल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने आगामी निवडणुका होणार असलेल्या सर्व महानगरपालिका व नगरपालिकांमधील निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक मार्च २०१६ मध्ये घेतली होती. त्या वेळी निवडणूक आयोगाने प्रभागरचना तयार करण्यासाठी एका सॉफ्टवेअरची यशस्वी चाचणी घेतली असून, सर्वांना प्रभागरचना तयार करण्यासाठी ते सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिले जाईल, असे सांगितले होते. त्यानंतर राज्यात महापालिकांच्या निवडणुका चार सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीने, तर नगरपालिकांच्या निवडणुका दोन सदस्यांचा एक प्रभाग, या पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने मे २०१६ मध्ये घेतला. निवडणूक आयोगाला त्याची माहिती देण्यात आली.
चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचे जाहीर केल्यानंतर, निवडणूक आयोगाने मुंबईमध्ये
सर्व पालिकेच्या निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका घेतल्या. त्या बैठकांमध्येही प्रभागरचना करण्यासाठी सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात येईल,
असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात
आले होते. अगदी आॅगस्टच्या मध्यापर्यंत निवडणूक विभागाचे अधिकारी या सॉफ्टवेअरची वाट पाहत होते; मात्र अचानक २० आॅगस्ट रोजी निवडणूक आयोगाने अधिसूचना प्रसिद्ध करून जुन्याच पद्धतीने मॅन्युअली प्रभागरचना तयार करण्याचे निर्देश सर्व महापालिकांच्या निवडणूक विभागांना दिले.
सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रभागरचना करण्याची सर्व तयारी पूर्ण झाली असताना, अचानक हा निर्णय बदलण्यात आला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला राजकीय वर्तुळातून मोठ्याप्रमाणात विरोध झाल्याने दबावापोटी हा निर्णय गुंडाळून ठेवण्यात आला. यामुळे एका पारदर्शक प्रक्रियेला मुकावे लागले आहे. नुकत्याच सर्व महापालिकांच्या प्रभागरचना जाहीर झाल्या आहेत. या प्रभागरचनेमध्ये सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्याप्रमाणात हस्तक्षेप केला असल्याची टीका केली जात आहे. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या नैसर्गिक सीमांचे निकष अनेक ठिकाणी पाळण्यात आलेले नाहीत. प्रभागांची मोठ्याप्रमाणात मोडतोड करण्यात आली असून, याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे दाद मागण्यात येईल, भाजपा वगळता इतर पक्षांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Prabharganchane has adopted the old method of Godavanganchal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.