Pradip Mehara: पुणे पोलिसाचं महत्त्वाचं आवाहन, प्रदीप मेहराच्या फोटोवरुन भन्नाट क्रिएटीव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 04:24 PM2022-03-25T16:24:00+5:302022-03-25T16:26:04+5:30

व्हायरल व्हिडिओतील प्रदीपला कारचालकाने दिलेली लिफ्ट तो नाकारतो

Pradip Mehara: Vinod Kaparr also appealed to Pune police from Pradip Mehra's viral photo | Pradip Mehara: पुणे पोलिसाचं महत्त्वाचं आवाहन, प्रदीप मेहराच्या फोटोवरुन भन्नाट क्रिएटीव्ह

Pradip Mehara: पुणे पोलिसाचं महत्त्वाचं आवाहन, प्रदीप मेहराच्या फोटोवरुन भन्नाट क्रिएटीव्ह

Next

मुंबई/पुणे - सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यामध्ये १९ वर्षांचा मुलगा रात्री उशिरा धावताना दिसत आहे. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या मुलाचे नाव प्रदीप मेहरा (Pradeep Mehra) असं आहे. तसेच तो मूळचा उत्तराखंडचा रहिवाशी असून आर्थिक संकटामुळे प्रदीप नोएडा येथील मॅकडोनाल्डमध्ये काम करतो. सैन्य दलात भरती होण्याची त्याची इच्छा आहे. त्यासाठी तो मोठे कष्टही घेत आहे. कामावरुन सुटल्यानंतर तो 10 किमी धावत आपल्या घरी पोहोचतो. या व्हायरल प्रदीप मेहराच्या फोटोवरुन पुणे पोलिसांनी भन्नाट क्रिएटीव्ह ट्विट केलं आहे. 

व्हायरल व्हिडिओतील प्रदीपला कारचालकाने दिलेली लिफ्ट तो नाकारतो. तसेच, आपल्या धेय्यासाठी मार्गक्रमण करतो. त्यावरुनच, पुणे पोलिसांच्या साबयर विभागाने भन्नाट मिम्स बनवले आहे. तुम्हालाही अशाचप्रकारे कुणीतरी ओटीपी मागेल, पण तुम्ही सुरक्षितपणे पुढे मार्गक्रम करत राहायचं. म्हणजेच, कोणालाही आपला ओटीपी द्यायचा नाही, कोणाच्याही गाडीत बसून स्वत:ची फसवणूक करुन घ्यायाची नाही, असे पुणे पोलिसांनी सूचवले आहे. 


फोनवरुन जेव्हा टेलिकॉलर तुम्हाला ओटीपी मागतात, तेव्हा त्यांच्या मोहात न पडता सुरक्षितपणे आपलं मार्गक्रमण करत राहायचं, असे कॅप्शन पुणे पोलिसांनी दिले आहे. विशेष म्हणजे पुणे पोलिसांचे हे क्रिएटीव्ह ट्विट दिग्दर्शक विनोद कापरी यांनाही आवडले असून त्यांनी ते रिट्विट केलं आहे. तसेच, मनापासून आवडल्याचं सिम्बॉलिक चिन्ह त्यांनी दर्शवलं आहे.  

काय आहे व्हायरल व्हिडीओत?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा रात्री उशिरा घराकडे धावत जात असल्याचं दिसत आहे. याच दरम्यान, विनोद कापरी हे त्याला आपल्या गाडीतून घरी सोडण्यीच ऑफर देतात. परंतु ते तो नाकारतो. त्यानंतर तो आपण मॅकडोनाल्डमध्ये काम करत असून शिफ्ट संपल्यानंतर घरी जात असल्याचंही सांगतो. आपलं नाव प्रदीप असल्याचं सांगतो उत्तराखंडच्या अल्मोडा येथील रहिवासी असल्याचंही त्यानं सांगितलं. तसंच आपण लष्करात जाण्यासाठी तयारी करत असून धावण्याचा सराव करण्यासाठी वेळ मिळत नाही, त्यामुळे सवय होण्यासाठी शिफ्ट संपवून घरी जाताना धावत घरी जात असल्याचंही तो सांगताना दिसत आहे.

Web Title: Pradip Mehara: Vinod Kaparr also appealed to Pune police from Pradip Mehra's viral photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.