पुण्यात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक : साखर संकुल ताब्यात घेण्याचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 03:10 PM2019-06-17T15:10:04+5:302019-06-17T15:16:47+5:30

पुण्यात प्रहार जनशक्ती चे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी साखर आयुक्त कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी संकुलाच्या छतावर जाऊन घोषणाबाजी केली.

Prahar activist protest in Pune against FRP issue | पुण्यात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक : साखर संकुल ताब्यात घेण्याचा प्रयत्न 

पुण्यात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक : साखर संकुल ताब्यात घेण्याचा प्रयत्न 

Next

पुणे :  पुण्यात प्रहार जनशक्ती चे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी साखर आयुक्त कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी संकुलाच्या छतावर जाऊन घोषणाबाजी केली.

    २०१८-१९मधील सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकीत एफ आर पी'ची रक्कम मिळावी याकरिता हे आंदोलन करण्यात आले. ३१मे च्या अखेरिसप्रमाणे सोलापूर व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सुमारे ६०० कोटी रुपये कारखानदारांकडून येणे बाकी आहे. ऊस कारखान्यात गेल्यावर नियमाप्रमाणे १४ दिवसांच्या आत पैसे मिळणे गरजेचे असताना चार महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. हे पैसे आठ दिवसांच्या आत मिळावेत अन्यथा आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अधिक तीव्र आन्दोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. 

आंदोलकांच्या मागण्या पुढीलप्रमाणे :

  • कारखानदार आणि सरकारच्या आपापसातल्या व्यवहारांची माहिती शेतकऱ्यांना कळावी, याकरिता ऍप करावे. 

 

  • एफ आर पीची माहिती ऑनलाईन मिळावी . 

 

  • शेतकऱ्यांसाठी शासनाने तयार केलेले ऍप त्वरित सुरु करावे. 

 

Web Title: Prahar activist protest in Pune against FRP issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.