प्रल्हाद सावंत हे क्रीडा क्षेत्रातील प्राध्यापक होते, क्रीडा, शिक्षण, राजकारणातील अनेक मान्यवरांची श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 02:21 AM2018-08-13T02:21:13+5:302018-08-13T02:21:31+5:30

प्रल्हाद सावंत हे क्रीडा क्षेत्रातील निष्णात प्राध्यापक होते. त्यांच्या निधनामुळे पुण्याच्या क्रीडा क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे

Prahlad Sawant was a professor in the field of sports, tribute to many dignitaries in sports, education and politics. | प्रल्हाद सावंत हे क्रीडा क्षेत्रातील प्राध्यापक होते, क्रीडा, शिक्षण, राजकारणातील अनेक मान्यवरांची श्रद्धांजली

प्रल्हाद सावंत हे क्रीडा क्षेत्रातील प्राध्यापक होते, क्रीडा, शिक्षण, राजकारणातील अनेक मान्यवरांची श्रद्धांजली

Next

पुणे : प्रल्हाद सावंत हे क्रीडा क्षेत्रातील निष्णात प्राध्यापक होते. त्यांच्या निधनामुळे पुण्याच्या क्रीडा क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दांत सिम्बायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेच माजी सचिव आणि ज्येठ क्रीडा संघटक प्रल्हाद सावंत यांना रविवारी श्रद्धांजली अर्पण केली.
सावंत यांचे गुरूवारी (दि. ९) निधन झाले. रविवारी संध्याकाळी मॅरेथॉन भवन येथे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या सभेत
अ‍ॅथलेटिक्सचे भीष्म पितामह... मॅरेथॉनचा महामेरू... ज्येष्ठ क्रीडा पत्रकार... उत्कृष्ट क्रीडा संघटक... आणि अष्टपैलू व्यक्तीमत्व अशा शब्दांत सावंत यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या वेळी बाबुराव सणस मैदानाच्या पॅव्हेलियनला क्रीडाक्षेत्रासाठी आयुष्य वाहिलेल्या प्रल्हाद सावंत यांचे नाव देण्यासाठी महापालिकेत ठराव करू, आणि ते काम मार्गी लावू अशी घोषणा भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी केली.
या सभेला यावेळी क्रीडा, राजकीय, वैद्यकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या. माजी आमदार उल्हास पवार, दिप्ती चवधरी, महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, अ‍ॅड. नरेंद्र निकम, अ‍ॅड. विजय सावंत, राजेंद्र कुंजीर, माजी उपमहापौर सतीश देसाई, डॉ. मधुसुदन झंवर, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. पराग संचेती, राज्याचे क्रीडा उपसंचालक नरेंद्र सोपल, शोभा निकम, आबा तुपे, अविनाश बागवे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उद्योजक भारत देसडला, सुमंत वाईकर, भारतकुमार व्हावळ, गुरबन्स कौर, आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपटू रोहन मोरे आदींची भाषणे झाली.

 

Web Title: Prahlad Sawant was a professor in the field of sports, tribute to many dignitaries in sports, education and politics.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.