प्रकाश आंबेडकर म्हणाले ‘राजकारणातला मी अस्पृश्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:10 AM2021-05-30T04:10:45+5:302021-05-30T04:10:45+5:30

पुणे : “मी सर्वांबरोबर जायला तयार आहे. पण मी तर राजकारणात अस्पृश्य आहे,” असे वंचित विकास बहुजन आघाडीचे अध्यक्ष ...

Prakash Ambedkar says 'I am untouchable in politics' | प्रकाश आंबेडकर म्हणाले ‘राजकारणातला मी अस्पृश्य’

प्रकाश आंबेडकर म्हणाले ‘राजकारणातला मी अस्पृश्य’

Next

पुणे : “मी सर्वांबरोबर जायला तयार आहे. पण मी तर राजकारणात अस्पृश्य आहे,” असे वंचित विकास बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

‘संभाजी राजांसमवेत तुम्ही जाणार का,’ या प्रश्नावर त्यांनी असे उत्तर दिले. छत्रपती संभाजी महाराज यांनी शनिवारी (दि.२९) अ‍ॅड. आंबेडकर यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. खासदार छत्रपती संभाजीराजे यावेळी उपस्थित होते.

अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, मी तर राजकारणातला अस्पृश्य आहे. मी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसबरोबर जायला तयार आहे. मात्र ते मला भाजपकडे ढकलतात. ज्याला मी तयार नाही. मी संभाजीराजेंबरोबर जाण्यास तयार आहे. शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आम्हाला मिळाला आहे. बहुजनांमधील जिव्हाळ्याचे संबंध वाढू द्यावे हा या भेटीमागे दृष्टिकोन असल्याचे संभाजीराजे मला म्हणाले.

“संभाजीराजेंनी पुढाकार घेतल्यास महाराष्ट्राच्या राजकारणाला आलेला शिळेपणा दूर होऊन ताजेपणा येईल”, असे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले. त्यावर अधिक स्पष्ट कराल का असे विचारता “२ जूनला त्याबाबत अधिक स्पष्टपणे सांगणार आहे,” असे ते म्हणाले. भाजपने संभाजी राजे यांना खासदार केल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यावर छत्रपती संभाजीराजे म्हणाले, “भाजपने राष्ट्रपतींच्या कोट्यातील खासदारपद दिल्याचे आपण कधी नाकारत नाही.”

Web Title: Prakash Ambedkar says 'I am untouchable in politics'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.