‘संस्कार’चा प्रकाश आदिवासींच्या घरोघरी
By Admin | Published: November 14, 2015 03:05 AM2015-11-14T03:05:03+5:302015-11-14T03:05:03+5:30
दिवाळी म्हटले की, आनंद, रोषणाई, अन् फटाकेबाजी आलीच... पण, प्रत्येकाच्याच घरात ही रोषणाई असतेच, असे नाही. ज्या भागात वीज, रस्ता यांची व्यवस्था नाही,
पिंपरी : दिवाळी म्हटले की, आनंद, रोषणाई, अन् फटाकेबाजी आलीच... पण, प्रत्येकाच्याच घरात ही रोषणाई असतेच, असे नाही. ज्या भागात वीज, रस्ता यांची व्यवस्था नाही, अशा आदिवासी विभागातील लोकांच्या घरोघरी आकाशकंदील लावून त्यांची दिवाळी झगमगावी, यासाठी संस्कार प्रतिष्ठानने प्रयत्न केले.
शहरात तर रोजच दिव्यांची रोषणाई असते; परंतु आदिवासी विभागात तीन
तासही अखंडित वीजपुरवठा नसतो. याकरिता यंदाची दिवाळी वेल्हा तालुक्यातील चांदर आदिवासी पाडा विभागातील आदिवासींसोबत साजरी करण्याचा निश्चय प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केला. केवळ निश्चय करून न थांबता उपक्रम राबविण्याची संपूर्ण तयारी केली.
पिंपरी-चिंचवडमधील शाळा-कॉलेजमध्ये जाऊन फटाकेमुक्त दिवाळी साजरी करून, फटाक्यांवर होणारा खर्च गरजूंवर खर्च करावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केले. यासाठी जनजागृती फेरी काढली. शाळा- कॉलेजच्या वर्गणीमधून जमा झालेल्या रकमेतून दिवाळीच्या पहिल्या दिवशी (९ नोव्हेंबरला) आदिवासी विभागातील ५० कुटुंबाच्या दारी आकाशकंदील लावले. स्त्रियांसाठी १०० साड्या, मुला-मुलींसाठी १०० ड्रेस आणि लहान मुलांना कपडे दिले. प्रत्येकाला फराळ आणि मिठाईचे वाटप केले.
सांगवीतील टाटा मोटर्स समाज केंद्राने वस्त्रदान उपक्रमाच्या माध्यमातून जमा
झालेले कपडे प्रतिष्ठानला मिळाले होते. शिवाय हा उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी कल्याण व संवर्धन संस्थेने सहकार्य केले. आकाशकंदील, मिठाई यासाठी रेणुका मिरपगार, तुषार कोंडे, दिगंबर गुंजाळ, दीपाली मोरे, पल्लवी चव्हाण, भाऊसाहेब मातणे आदींनी सहकार्य केले. डॉ. मोहन गायकवाड व सोमनाथ पतंगे यांनी उपक्रमांचे संयोजन केले.