पोलिसाने वाचविले चिमुकल्याचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 02:29 AM2018-04-06T02:29:41+5:302018-04-06T02:29:41+5:30
येथील रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाने आपल्या जिवाची पर्वा न करता पाण्याच्या डोहात बुडणा-या एका ७ वर्षाच्या मुलाचे प्राण वाचविले.
रांजणगाव गणपती - येथील रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाने आपल्या जिवाची पर्वा न करता पाण्याच्या डोहात बुडणा-या एका ७ वर्षाच्या मुलाचे प्राण वाचविले. खाकी वर्दीतील माणसाने माणुसकीचे दर्शन घडविल्याने पोलिसांच्या संवेदनशीलतेचे प्रत्यंतर आले.
रघुनाथ भीमराव हाळनोर असे या पोलिसाचे नाव असून, त्यांनी चैतन्य दीपक जोरी (वय ७, मूळ केडगाव, अहमदनगर, सध्या रा.कारेगाव, ता.शिरुर) याचे प्राण वाचविले. घटनेची नोंद रांजणगाव पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारच्या सुमारास रांजणगाव पोलीस स्टेशनजवळ असलेल्या दगडखाणीच्या डोहात काही मुले खेळत होते. पाणी खोल असल्याने चैतन्य बुडत असल्याचे इतर मुलांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून रघुनाथ हाळनोर यांनी डोहाकडे धाव घेतली. पाण्यात बुडबुडे येत असल्याचे पाहून त्यांनी पाण्यात उडी मारली.
चैतन्यला त्यांनी बाहेर काढून हाताने पंपीग करुन पोटातील पाणी काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस मित्र नानासाहेब पोटे यांच्या रुग्णवाहिकेतून त्वरित रांजणगाव गणपती येथील गजानन हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ नेले. त्याला पुढील उपचारार्थ ससून रुग्णालयात दाखल केले असून प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले.
आई रोजदारंीवर कंपनीत काम करणारी व वडील चालक म्हणून
काम करतात.या जोरी दाम्पंत्याचा दिपक हा एकुलता एक मुलगा असून तो या दुर्घटनेतून वाचल्याने रघुनाथ हाळनोर यांच्या रुपाने त्यांना देवच भेटल्याच्या प्रतिक्रया पालकांनी व्यक्त केली आहे.