दैव बलवत्तर म्हणून वाचले प्राण

By Admin | Published: April 24, 2017 05:10 AM2017-04-24T05:10:34+5:302017-04-24T05:10:34+5:30

संध्याकाळी ६.३० वाजण्याची वेळ... वाहतुकीने गजबजलेला कर्वे रस्ता... भरधाव वाहने येत असताना एका व्यक्तीने पळत पळत रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला.

Prana survived as a fortune | दैव बलवत्तर म्हणून वाचले प्राण

दैव बलवत्तर म्हणून वाचले प्राण

googlenewsNext

पुणे : संध्याकाळी ६.३० वाजण्याची वेळ... वाहतुकीने गजबजलेला कर्वे रस्ता... भरधाव वाहने येत असताना एका व्यक्तीने पळत पळत रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. वाहनचालकाने प्रसंगावधान राखून करकचून ब्रेक दाबल्याने गाडी जागच्या जागी थांबली आणि पादचाऱ्याचे दैैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली.
महापालिकेतर्फे पादचाऱ्यांच्या सोयीसाठी पादचारी पूल बांधण्यात आले आहेत. महापालिका बसस्थानक, एसएनडीटी चौैक, मृत्युंजय मंदिर, कोथरूड स्टँड, जुना बाजार ते कामगार पुतळा आदी ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी पूल बांधले असूनही नागरिक त्याचा वापर न करता रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे.

Web Title: Prana survived as a fortune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.