चित्रपट व नाट्य सृष्टीतील निर्माता व दिग्दर्शकांना अभिनेते व लेखक प्रवीण तरडे यांचं भावनिक आवाहन; म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 05:16 PM2021-05-05T17:16:32+5:302021-05-05T17:18:47+5:30

माझे चित्रपट यशस्वी झाले, त्यामागे पडद्यामागच्या कलाकारांचा मोठा हातभार आहे....

Praveen Tarde's emotional appeal to film and drama producers and directors; Said .... | चित्रपट व नाट्य सृष्टीतील निर्माता व दिग्दर्शकांना अभिनेते व लेखक प्रवीण तरडे यांचं भावनिक आवाहन; म्हणाले....

चित्रपट व नाट्य सृष्टीतील निर्माता व दिग्दर्शकांना अभिनेते व लेखक प्रवीण तरडे यांचं भावनिक आवाहन; म्हणाले....

googlenewsNext
ठळक मुद्देमुकुलमाधव फाउंडेशन व क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने 100 कलावंताना मदतीचा हात

पुणे : कोरोना संकटामुळे सर्वच व्यवसायांना फटका बसला आहे.छोटे मोठे असे सर्वच व्यावसायिक अडचणीत आले आहे. याला चित्रपट किंवा नाट्य क्षेत्र देखील अपवाद नाही. त्यामुळे निर्माता व दिग्दर्शकांनी नफ्यातील काही वाटा पडद्यामागील कलाकार व तंत्रज्ञ यांच्यासाठी ठेवावा.  पडद्यावर चकाकणाऱ्या चेहऱ्यामागे हजारो हात असतात व कोरोना संकट असो किंवा इतर वेळी त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे हाल होत असल्याने त्यांच्या संकटकाळात हा निधी उपयुक्त ठरेल असे मत प्रसिद्ध अभिनेते, लेखक व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी असल्याने त्यांच्या संकटकाळात हा निधी उपयुक्त ठरेल, निर्माता व दिग्दर्शकांनी नफ्यातील काही वाटा पडद्यामागील कलाकार व तंत्रज्ञ यांच्यासाठी ठेवावा, असे आवाहन केले आहे. 

क्रिएटिव्ह फाउंडेशन व मुकुलमाधव फाउंडेशनच्या वतीने १०० कलावंताना मदतीचा हात अन्न धान्यासह संसारोपयोगी वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते .तरडे म्हणाले, माझे चित्रपट यशस्वी झाले त्यामागे पडद्यामागच्या कलाकारांचा मोठा हातभार आहे. माझ्या परीने मी त्यांना मदत करत आहे. मात्र संकटकाळासाठी कायमस्वरूपी मदत निधी उभा करणे काळाची गरज आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने पडद्यामागील कलाकारांचा विचार करून अन्य राज्यांप्रमाणे मालिका व चित्रपटांच्या चित्रीकरणास परवानगी द्यावी, अशी मागणी ही त्यांनी केली.

प्रसिद्ध गीतकार व शांताबाई ह्या गाण्यामुळे लोकप्रिय झालेले कलावंत संजय लोंढे यांना ही धनादेश व एक महिन्याचे रेशन अशी मदत देण्यात आली. यावेळी प्रसिद्ध अभिनेते रमेश परदेशी, शिक्षण समिती अध्यक्ष व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,मुकुलमाधव फाउंडेशनचे श्री. मोकळे, यास्मिन शेख आदी उपस्थित होते.

यावेळी अभिनेते रमेश परदेशी यांनी कोरोना संकटकाळात कलाकाराला लोकाश्रय मिळत आहे पण राजाश्रय कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला.तसेच प्रवीण तरडे यांनी लॉकडाऊन काळात तब्बल 14 लाख रुपये पडद्यामागील कलावंतांसाठी दिले. हा कित्ता इतरांनी ही गिरवावा. 

संदीप खर्डेकर म्हणाले, कलाकार हा वर्षभर आपले मनोरंजन करत असतो त्याच्या मेकअप आड त्याचे दुःख लपवून तो फक्त प्रेक्षकांच्या टाळ्यांचा आणि कौतुकाचा भुकेला असतो. मात्र ह्या संकटकाळात नाटकं, चित्रपट व मालिकांना मोठा फटका बसला असून अनेक कलावंत जगण्यासाठी धडपडत आहेत. अशावेळी त्यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे.

Web Title: Praveen Tarde's emotional appeal to film and drama producers and directors; Said ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.