मृत्युचा बनाव रचणाऱ्या सासरच्या मंडळीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:11 AM2021-05-18T04:11:10+5:302021-05-18T04:11:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मूल होत नसल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळीकडून विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात ...

The pre-arrest bail of the father-in-law's congregation, who had plotted the death, was rejected | मृत्युचा बनाव रचणाऱ्या सासरच्या मंडळीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

मृत्युचा बनाव रचणाऱ्या सासरच्या मंडळीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मूल होत नसल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळीकडून विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. त्यामुळे तिने गळफास लावून आत्महत्या केली. मात्र तिचा उपचारामुळे रक्तस्राव होवून मृत्यू झाला असल्याचा बनाव रचल्याप्रकरणातील तिघांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायाधीश एम. एम. देशपांडे यांनी फेटाळला.

कल्पना बबुशा दरेकर (सासू), राहुल बबुशा दरेकर (दीर), कोमल राहुल दरेकर (जाऊ) (सर्व रा. सणसवाडी, ता. शिरूर) अशी अटकपूर्व जामीन फेटाळलेल्यांची नावे आहेत. चैत्राली योगेश दरेकर (वय २६) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणात तिचा पती योगेश बबुशा दरेकर (वय ३०) याला अटक केली असून, तो सध्या पोलिस कोठडीमध्ये आहे.

शिरूर तालुक्यातील सणसवाडी गावात १ मे २०२१ रोजी ही घटना घडली. चैत्राली हिचे योगेशशी २०१५ साली लग्न झाले. मात्र लग्नानंतर सासरच्या मंडळीकडून मूल होत नसल्याच्या कारणावरून चैत्रालीचा छळ करण्यास सुरूवात झाली. त्याला कंटाळून तिने राहत्या घरी आत्महत्या केली. यादरम्यान, आरोपींनी चैत्राली हिने गळफास घेतलेली दोरी कापून तिचा मृतदेह खाली उतरविला. तिच्या गळ्यातील दोर काढून तिला घरात झोपविले. यावेळी, मूल होण्याच्या उपचारामुळे रक्तस्राव होऊन ती मयत झाली असल्याचा बनाव करत फरशीवर पाणी ओतून पुरावा नष्ट केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी बचाव पक्षाच्या वतीने अर्ज करण्यात आला. त्यास सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी विरोध केला. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पसार झाले आहेत. संबंधित गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून, आरोपींनी चैत्राली हिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिचे जगणे असह्य करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. चैत्राली ही उच्चशिक्षित असल्याने तिने आत्महत्या करण्यापूर्वी यातील आरोपी विरुध्द चिठ्ठी लिहून ठेवली असण्याची शक्यता आहे. त्याचा तपास करायचा असल्याने त्यांना पोलिस कोठडीची गरज आहे. त्यांना जामीन मंजूर झाल्यास ते साक्षीदारांना प्रलोभन अथवा धाकदपटशा करून त्यांना योग्य साक्षीपासून परावृत्त करण्याची दाट शक्यता असल्याचा युक्तिवाद ॲड. सप्रे यांनी केला. तो न्यायालयाने ग्राह्य धरत अटकपूर्व जामीन फेटाळला. याप्रकरणाचा अधिक तपास शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक के. के. भालेकर तपास करत आहेत.

Web Title: The pre-arrest bail of the father-in-law's congregation, who had plotted the death, was rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.