पूर्व हवेलीत मतदारांच्या रांगा
By admin | Published: August 5, 2015 03:29 AM2015-08-05T03:29:18+5:302015-08-05T03:29:18+5:30
पूर्व हवेलीमध्ये किरकोळ बाचाबाचीचा अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. आठ ते दहा दिवसांत प्रचाराची रणधुमाळी व आरोप-प्रत्यारोप
लोणी काळभोर : पूर्व हवेलीमध्ये किरकोळ बाचाबाचीचा अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
आठ ते दहा दिवसांत प्रचाराची रणधुमाळी व आरोप-प्रत्यारोप यांमुळे उत्तरोत्तर रंगतदार होत
गेलेल्या ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदारराजाने मत देऊन उमेदवाराचे नशीब आज मतदान यंत्रात बंद केले.
पॅनलप्रमुख व सर्व उमेदवारांनी संपूर्ण पॅनल किंवा आपणच निवडून येण्याच्या वल्गना केल्या असल्या तरी गुरुवारी (दि. ६) मतमोजणी झाल्यानंतरच या सर्व गोष्टींना पूर्णविराम मिळणार आहे.
आज पूर्व हवेलीत लोणी काळभोर (७१), कुंजीरवाडी (९०), आळंदी म्हातोबाची (९५), सोरतापवाडी (८०.५६), उरुळी कांचन (६९), कोरेगाव मूळ (८५), शिंदवणे (९५), वळती (९२), टिळेकरवाडी (७७ टक्के) मतदान झाले.
अपंग व वृद्ध मतदारांनाही आणण्यामध्ये चढाओढ लागली
होती.
सायंकाळी ५.३० वाजता मतदानाची वेळ संपली. त्या वेळीही मतदारांना आणण्याचा सपाटा चालूच होता.
मतदान संपल्यानंतर प्रत्येकानेच आपणच बहुमताने निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त
केला. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक
बी. ए. कोंडूभैरी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांनी योग्य बंदोबस्त लावल्यामुळे कसलाही अनुचित प्रकार घडला नाही.