शहराच्या काही भागात पूर्वमोसमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2016 12:42 AM2016-06-04T00:42:33+5:302016-06-04T00:42:33+5:30

दिवसभर उकाड्यानंतर रात्री शहराच्या काही भागात मान्सून पूर्व पावसाच्या हलक्या सरी आल्या़ शुक्रवारी दिवसभर उकाडा जाणवत होता़ सायंकाळनंतर आकाशात ढग दाटून आले होते़

Pre-monsoon rain in some parts of the city | शहराच्या काही भागात पूर्वमोसमी पाऊस

शहराच्या काही भागात पूर्वमोसमी पाऊस

Next

पुणे : दिवसभर उकाड्यानंतर रात्री शहराच्या काही भागात मान्सून पूर्व पावसाच्या हलक्या सरी आल्या़ शुक्रवारी दिवसभर उकाडा जाणवत होता़ सायंकाळनंतर आकाशात ढग दाटून आले होते़ पण, सोसायट्याचा वाऱ्या काही वेळातच हे ढग पांगले़ सायंकाळनंतर शहराच्या काही भागात भुर भुर पावसाची सुरुवात झाली़
रात्री आठच्या सुमारास एरंडवणे, कोथरूड, कर्वेनगर, धानोरी, चऱ्होली, हडपसर अशा शहराच्या वेगवेगळ्या भागात पावसाची हलकी सर आली़ घरी जाणाऱ्या नागरिकांनी भिजत जात पावसाचा आनंद लुटला़ तर, काही नागरिकांनी पावसाचा अंदाज घेऊन अगोदरच छत्री, रेनकोट बरोबर घेतले असल्याचे दृश्य रस्त्यावर दिसून आले़ पुढील चार ते पाच दिवस शहराच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़

वीज पडून एकाचा मृत्यू
पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथील महेंद्र मारुती रासकर (वय,३४) यांचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.३) सायंकाळी घडली. विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस येत असल्यामुळे महेंद्र रासकर हे सुरेश रासकर यांच्या घरामध्ये गेले व खिडकीतुन बाहेर पहात होते त्यावेळी अचानक वीज पडली.

Web Title: Pre-monsoon rain in some parts of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.