कुरुळी परिसरात माॅन्सूनपूर्व मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:08 AM2021-06-01T04:08:48+5:302021-06-01T04:08:48+5:30
कामावरून घरी निघालेल्या अनेकांना पावसामुळे थांबण्याची प्रतीक्षा करावी लागली, तर काहींनी भिजतच घर गाठले. कुरुळी परिसरात गेले दोन दिवस ...
कामावरून घरी निघालेल्या अनेकांना पावसामुळे थांबण्याची प्रतीक्षा करावी लागली, तर काहींनी भिजतच घर गाठले. कुरुळी परिसरात गेले दोन दिवस दुपारनंतर माॅन्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत असल्यानेतसेच दिवसाआड आकाशात ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचे आगमन होत असल्याने शेतकरी सुखावला आहे. गेले काही दिवस ढगाळ वातावरणानंतर आजच्या दमदार पावसाच्या हजेरीने सारा परिसर थंडावला आहे. कुरुळी, चिंबळी, मोई, निघोजे, आदी भागात माॅन्सूनपूर्व पाऊस झाला. माॅन्सूनच्या पावसापूर्वी शेतातील कामे उरकून घेण्याच्या मागे शेतकरी लागले आहेत.जिल्ह्यात कोरोना विषाणूचे संकट असले तरी ग्रामीण भागातील शेतकरी सध्या खरीप हंगामपूर्व मशागतीच्या कामात गुंतले आहेत. रानातील नांगरणी करणे, खत विस्कटणे आदी कामांना आता वेग येणार आहे.या मुसळधार पावसामुळे परिसरातील वीजपुरवठा देखील खंडित झाला होता.
कुरुळी परिसरात मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले होते.