कौतुकास्पद! माजी अग्निशमन दलातील अधिकाऱ्याने प्रसंगावधान दाखवत केली आगीवर मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 18:19 IST2022-01-22T17:23:53+5:302022-01-22T18:19:33+5:30
पुणे : आज सकाळी नऊच्या सुमारास वडारवाडी येथील सावंत चौकात असणाऱ्या मॅनेजमेंट कॉलेज, कैलास हाऊसिंग सोसायटी लगत एका इलेक्ट्रिक ट्रॉन्सफॉर्मरने ...

कौतुकास्पद! माजी अग्निशमन दलातील अधिकाऱ्याने प्रसंगावधान दाखवत केली आगीवर मात
पुणे: आज सकाळी नऊच्या सुमारास वडारवाडी येथील सावंत चौकात असणाऱ्या मॅनेजमेंट कॉलेज, कैलास हाऊसिंग सोसायटी लगत एका इलेक्ट्रिक ट्रॉन्सफॉर्मरने अचानक पेट घेतला. यामध्ये आगीने रौद्र रुप धारण केले होते. त्याची माहिती नागरिकांनी अग्निशमन दल व महावितरण यांना दिली. कसबा अग्निशमन केंद्र येथून लगेच वाहन रवाना करण्यात आले.
त्याचवेळी तेथे कर्तव्य बजावणारे महापालिकेच्या चित्तरंजन वाटिका आरोग्य कोठीचे आरोग्य निरीक्षक व यापूर्वी अग्निशमन दलात काम केलेले जवान विनोद सरोदे हे तिथे हजर होते. त्यांनी वेळेचे गांभीर्य व आगीचा भडका पाहून अनुभवाच्या जोरावर त्यांनी जेट मशिनच्या पाईपचा आधार घेत धाडसाने भिंतीवर चढून पाण्याचा मारा करत आग शमवली व धोका दूर केला. त्याचवेळी अग्निशमनचे वाहन व महावितरणचे कर्मचारी ही दाखल झाले. अग्निशमन व महावितरणने पुढील कार्य पार पाडले.
विनोद सरोदे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्यांचे नागरिक व इतर जवानांनी कौतुक केले. कसबा अग्निशमन केंद्र येथील चालक संदीप थोरात, संतोष अरगडे, गणेश लोणारे, सुरेश पवार यांनी सहभाग घेतला.