प्रियकराकडून प्रेयसीचा खून
By admin | Published: May 24, 2017 04:32 AM2017-05-24T04:32:52+5:302017-05-24T04:32:52+5:30
बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेचा चाकूने भोसकून खून करण्याची घटना मंगळवारी रात्री ११ वाजता घडली़ बुधवार पेठेतील दाणेआळी येथे भररस्त्यावर ही घटना घडली़
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेचा चाकूने भोसकून खून करण्याची घटना मंगळवारी रात्री ११ वाजता घडली़ बुधवार पेठेतील दाणेआळी येथे भररस्त्यावर ही घटना घडली़ बिती मुल्ला (वय २२, रा़ जनता बिल्डिंग, बुधवार पेठ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे़ याप्रकरणी पोलिसांनी सुखदेव रामदास मडावी (वय २७, रा़ मु़ गणेशवाडी, पो़ नांजा, ता़ कळंब, जि़ यवतमाळ, सध्या रा़ वडारवाडी) याला अटक केली आहे़ याबाबत मिळालेली माहिती अशी : ही महिला बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करीत होती़ तिचा प्रियकर तिच्याकडे नेहमी येत असे़ मंगळवारी रात्री त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला़
भररस्त्यावर त्यांच्यात भांडणे सुरू असताना त्याने या महिलेच्या पोटावर, गळ्यावर चाकूने सपासप वार केले़ ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर तो पळून जाऊ लागला़ तेव्हा लोकांनी त्याला पकडून शुक्रवार पेठ पोलीस चौकीत आणून पोलिसांच्या हवाली केले़
जखमी अवस्थेत या महिलेला ससून रुग्णालयात नेण्यात आले़ तेथे डॉक्टर तपासणीपूर्वीच तिचा मृत्यू झाला़ फरासखाना पोलीस खुनाच्या घटनेचा तपास करीत आहेत़