सिमेंटच्या रस्त्यांवर बेसुमार चेंबर्स

By admin | Published: April 7, 2015 05:48 AM2015-04-07T05:48:14+5:302015-04-07T05:48:14+5:30

शहरातील अनेक छोटे-मोठे रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे काम जोरात सुरू आहे, या रस्त्यांमध्ये गरज नसतानाही ड्रेनज व पावसाळी चेंबरची

Precious chambers on cement roads | सिमेंटच्या रस्त्यांवर बेसुमार चेंबर्स

सिमेंटच्या रस्त्यांवर बेसुमार चेंबर्स

Next

दीपक जाधव, पुणे
शहरातील अनेक छोटे-मोठे रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे काम जोरात सुरू आहे, या रस्त्यांमध्ये गरज नसतानाही ड्रेनज व पावसाळी चेंबरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविली जात आहे. ठरवून दिलेल्या निकषानुसार ३० मीटरच्या अंतरावर चेंबर्स असणे आवश्यक असताना निकष वाऱ्यावर बसवून दोन-दोन फुटांवर चेंबर उभारण्यात येत आहेत. यामुळे रस्त्यांची वाट लागत असून पैशांची प्रचंड उधळपट्टी होत आहे.
शहरामध्ये एक लाखांपेक्षा जास्त ड्रेनेज आहेत. त्यातील अनेक ड्रेनेज रस्त्यांच्या मधोमध असणे, समान पातळीवर नसणे, त्याचे झाकण खचलेले असणे अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. याचा वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. ड्रेनेजच्या वाईट अवस्थेमुळे अपघाताच्या घटनाही सतत घडत असतात. त्यातच नव्याने बांधण्यात येत असलेल्या सिमेंट रस्त्यांवर ड्रेनेज व पावसाळी चेंबरची संख्या वाढविण्यात येत आहे. महापालिकेच्या निकषानुसार ३० मीटरवर एक ड्रेनेज उभारणे आवश्यक आहे. मात्र या निकषाचे पालनच केले जात नाही. विशेषत: पेठांमध्ये ड्रेनेजच्या चेंबर्सची संख्या खपूच वाढत असल्याचे लक्षात आल्यानंंतर आम्ही पुणेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी सहाणे यांनी मलनिस्सारण विभागाकडे याबाबतची माहिती मागितली.
शनिवार वाडाच्या शिवाजी रस्त्यावरील गेटपासून ते त्वेष्टा कासार मंदिरापर्यंत सिमेंटचा रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याठिकाणी फुटाफुटांवर चेंबर्स बसविण्यात आले. त्याबरोबर डांबरी रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात चेंबर्स असून त्यांची दुरवस्था झालेली आहे. गांजवे चौक ते विठ्ठल मंदिर, शिवाजी रस्ता, शीतळादेवी ते खडकमाळ आळी, शाहू चौक ते मासे आळी, कुमठेकर रस्ता, बाजीराव रस्ता, बिबवेवाडी रस्ता, आंबेमाता चौक, सुखसागरनगर, वानवडी तसेच पेठांमधील गल्ली-बोळातील रस्त्यांवरील चेंबर्सची दुरवस्थेत असल्याचे दिसून आले. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे रवी सहाणे यांनी पुराव्यानिशी याबाबतची माहिती सादर केली. त्यानंतर बकोरिया यांनी सहाणे यांच्यासमवेत जाऊन याची नुकतीच पाहणी केली असून लवकरच याबाबत योग्य ती कार्यवाही करू, असे सांगितले आहे.
चेंबर्सबाबत माहिती १५ पैकी केवळ औंध, विश्रामबागवाडा, धनकवडी, भवानी पेठ, हडपसर, सहकारनगर, घोले रोड या ७ कार्यालयांनी उपलब्ध करून दिली आहे. त्यापैकी क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत किती चेंबर्स आहेत, याची माहिती केवळ भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडेच उपलब्ध आहे.

Web Title: Precious chambers on cement roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.