ज्येष्ठांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:12 AM2021-05-06T04:12:02+5:302021-05-06T04:12:02+5:30

-- काटेवाडी : कोरोनामुक्त गावासाठी प्राधान्याने ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण गरजेचे आहे, ज्येष्ठांतील आजारी रुग्णास प्राधान्याने लसीकरण करावे ...

Prefer senior vaccination | ज्येष्ठांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या

ज्येष्ठांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या

Next

--

काटेवाडी : कोरोनामुक्त गावासाठी प्राधान्याने ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण गरजेचे आहे, ज्येष्ठांतील आजारी रुग्णास प्राधान्याने लसीकरण करावे असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यानी दिले आहेत. कोराेनाच्या प्रार्श्वभूमीवर आयुष प्रसाद यांनी काटेवाडी गावास भेट दिली. रुग्णांचा आढावा घेतला. या वेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, सभापती नीता फरांदे तालुका वैदकीय आधिकारी मनोज खोमणे, डॉ. मार्तड जोरी, उपसरपंच समीर मुलाणी, अमोल काटे, पोलीस पाटील सचिन मोरे, धीरज घुले, अमर जगताप, अजित काटे उपस्थित होते

प्रसाद म्हणाले की, लसीचा तुटवडा असल्याने तालुक्यातील कोरोना हॉटस्पॅाट असलेल्या गावांतली संरपच, ग्रामसेवक व प्रशासन यांनी नियोजन करून ग्रामस्तरावरच ज्येष्ठ नागरिकाचे दोन डोस पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. गावात कोरोना रुग्ण सापडल्यास त्या रुग्णाच्या कुटुंबासह त्यांच्या सहवासात आलेल्याची तपासणी करण्यात यावी. त्यांची दैनंदिन नोंद ठेवून उपचारकरण्यासंबधी नियोजन करावे अशा कडक सूचना दिल्या.

प्रसाद म्हणाले की, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका यांनी कोरोना बाधित प्रतिबंध क्षेत्रातील नागरिकांची सक्तीने तपासणी करावी. ऑक्सिजनचे प्रमाण तपासावे, शिक्षकांनी ही गावाला भेट देऊन आशा अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील यांच्याकडून रुग्णाची माहिती गोळा करून कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्राला सादर करावी. रुग्णाची माहिती सरपंच ग्रामसेवक व तलाठी यांना त्वरित देण्यात यावी मास्क वापर, सॅनिटायझरचा वापर सोशल डिस्टन्सिंगचा वापर यामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे. शेजारी माळशिरस, फलटण, खडाळा तालुक्यात रुग्ण वाढत आहे त्यामुळे बारामती तालुक्यात आरोग्य सेवेचा ताण वाढणार आहे यामुळे सर्व घटकांनी खबरदारी घ्यावी.

यावेळी सरपंच विद्याधर काटे व ग्रामसेवक बाळासाहेब भोईटे यांनी गावातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन माहिती दिली.

--

फोटो ०५ काटेवाडी आयुष्प्रसाद

Web Title: Prefer senior vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.