दिव्यांग व्यक्तींना कोरोना लसीकरणात प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:15 AM2021-05-05T04:15:31+5:302021-05-05T04:15:31+5:30
दिव्यांग व्यक्तींची प्रवासाची व रांगेत तिष्ठत उभे राहण्याची अडचण लक्षात घेत राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना कोरोना टेस्टिंग, कोरोना बाधित ...
दिव्यांग व्यक्तींची प्रवासाची व रांगेत तिष्ठत उभे राहण्याची अडचण लक्षात घेत राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना कोरोना टेस्टिंग, कोरोना बाधित असल्यास त्यावरील उपचार आणि लसीकरणाच्या ठिकाणी प्राधान्य देण्यात यावे. त्यांना कोणत्याही रांगेत उभे करू नये, असे स्पष्ट निर्देश अध्यादेशाद्वारे सोमवारी देण्यात आले आहेत. तसेच आरोग्य विभागाने या निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, असेही त्यात नमूद केले आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात येत नाही तोपर्यंत दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयातील उपस्थिती राहण्याबाबत सूट देण्यात आली आहे. कार्यालय उपस्थितीतून सूट देण्यासह दिव्यांग व्यक्तींना कोरोना टेस्टिंग, उपचार व लसीकरणासाठी प्राधान्य देणे या दोन्ही निर्णयाचे अनेक दिव्यांग कर्मचारी संघटना तसेच विविध सामाजिक संस्थांनी स्वागत केले आहे.