योग्य वयातील गर्भधारणेमुळे गुंतागुंत होण्याची शक्यता कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:15 AM2021-04-30T04:15:02+5:302021-04-30T04:15:02+5:30

पुणे : स्त्रियांच्या वयानुसार प्रजनन क्षमता देखील बदलत असते. जीवशास्त्रीयदृष्ट्या गर्भवती होण्याचे योग्य वय २० ते ३० वर्षे मानले ...

Pregnancy at the right age reduces the chances of complications | योग्य वयातील गर्भधारणेमुळे गुंतागुंत होण्याची शक्यता कमी

योग्य वयातील गर्भधारणेमुळे गुंतागुंत होण्याची शक्यता कमी

Next

पुणे : स्त्रियांच्या वयानुसार प्रजनन क्षमता देखील बदलत असते. जीवशास्त्रीयदृष्ट्या गर्भवती होण्याचे योग्य वय २० ते ३० वर्षे मानले जाते. वाढत्या वयानुसार स्त्रियांमधील प्रजनन क्षमता कमी होऊ लागते आणि त्याचा परिणाम गर्भधारणेवर होतो. उशिराने होणारी गर्भधारणा धोकादायक ठरत असून योग्य वेळी गर्भधारणा करणे फायदेशीर ठरत आहे.

आर्थिक अस्थिरता, करिअरच्या दृष्टीने घेतलेली झेप, उशिरा लग्न किंवा काही वैद्यकीय कारणांमुळे स्त्रियांनी गरोदरपणात उशीर केल्यामुळे वंध्यत्वासारख्या समस्येला सामोरे जावे लागते. वयाचा परिणाम प्रजनन क्षमततेवरही होतो. प्रसूतितज्ज्ञ डॉ. राजेश्वरी पवार म्हणाल्या, ''महिलांमधील अंडयाचे प्रमाण मर्यादित असते. आईच्या गर्भातील स्त्री भ्रूणामध्ये १ दशलक्ष अंडी असतात व बाळाचा जन्म होईपर्यंत केवळ ४०० ते ५०० उपयुक्त अंडी उरतात. ऋतूप्राप्तीनंतर दर महिन्याला एक किंवा दोन अंडी गर्भाशयात सोडली जातात. स्त्रीची मेनोपॉजची स्थिती येईपर्यंत गर्भाशयातील अंड्यांची संख्या कमी कमी होत जाते. काही वेळा स्त्रीची पाळी नियमित येते. परंतु, तिच्यातील अंड्यांचा साठा पूर्णपणे संपलेला असतो. विशीच्या अखेरीस किंवा तिशीच्या सुरुवातीला महिलांची प्रजनन क्षमता झपाट्याने घटू लागते. वय वाढ लागल्यावर तिच्यातील अंड्यांची गुणवत्ता देखील घटू लागते आणि ती पूर्वी इतक्या वारंवारपणे ओव्ह्युलेट होत नाही. उशीरा आई होताना अंड्यांमध्ये क्रोमासोमोल एबनॉर्मिलिटी (गुणसूत्रातील दोष ) असण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे गर्भधारणा होणे अवघड होते किंवा गरोदर असताना गर्भपात असण्याची भीती असते. स्त्रिया जेव्हा ३० आणि ४० च्या दशकात प्रवेश करतात तेव्हा डाऊन सिंड्रोम सारख्या गुणसूत्र विकृतीचा धोका वाढतो कारण स्त्री जसजशी मोठी होते तसतसे अंडीही मोठी होतात.

वय वाढण्याबरोबरच मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि संबंधित आजार होण्याची शक्यता वाढते आणि परिणामी कमी प्रजनन होते. गर्भधारणा झाली तर अशा परिस्थितीत गुंतागुंत वाढू शकते, असेही त्यांनी नमूद केले.

आधुनिक उपचार पद्धतीत पर्याय

फर्टिलिटी कन्सल्टंट डॉ. करिश्मा डाफळे म्हणाल्या , ''तुम्ही सहा महिने ते एक वर्षभर गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करत असाल आणि गर्भधारणा होत नसेल तर तुम्ही अँटी मुल्यरियन हार्मोन (एएमएच) चाचणी करून घ्यावी. असे केल्याने एखाद्या महिलेस गर्भधारणेची योजना केव्हा आणि कशी करावी याबद्दल कल्पना येईल. आधुनिक उपचार पध्दतीनुसार एग फ्रीझिंगचा पर्याय निवडून गर्भधारणा पुढे ढकलता येऊ शकते.''

Web Title: Pregnancy at the right age reduces the chances of complications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.